BREAKING NEWS:
महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात वातावरण बदलले, पावसाचे आगमन

Summary

दिवसभराच्या नियमित हवामानानंतर सायंकाळनंतर सोलापूर जिल्ह्यात वातावरण बदलले. सोलापूर जिल्ह्यात आलेल्या वेगाच्या वाऱ्यासोबत पावसाचेही आगमन झाले. त्यामुळे रात्री मंगळवेढा शहरात या अवकाळी पावसाने सलामी दिली. या सोबतच अन्य भागातही रात्री पावसाचे आगमन झाले. यामुळे वातावरणाचा रंग पालटून गेला आहे. हवामान […]

दिवसभराच्या नियमित हवामानानंतर सायंकाळनंतर सोलापूर जिल्ह्यात वातावरण बदलले. सोलापूर जिल्ह्यात आलेल्या वेगाच्या वाऱ्यासोबत पावसाचेही आगमन झाले. त्यामुळे रात्री मंगळवेढा शहरात या अवकाळी पावसाने सलामी दिली. या सोबतच अन्य भागातही रात्री पावसाचे आगमन झाले. यामुळे वातावरणाचा रंग पालटून गेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार सायंकाळी हलक्या पावसाचे आगमन सोलापूर जिल्ह्यात झाले. मंगळवेढा शहरातही रात्री ८ वाजताच्या सुमारास सौम्य वादळ आले. त्यानंतर रात्री  मेघ गर्जनेसह पावसाला प्रारंभ झाला. मध्य प्रदेशमध्ये पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले.

या वातावरणाची झळ शेतकऱ्यांना काही वेळातच बसली. मंगळवेढा शहरात रात्री  पावसाच्या हलक्या सरी आल्या. पंढरपूर तालुक्यातही पावसाचे आगमन झाले.

बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यात गारपिटीचा आणि मेघगर्जनेसह पाऊस येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असून खळ्यावरील माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विजांपासून रक्षण करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

रात्री तापमान खालावले

सोलापूर जिल्ह्यांमध्ये दिवसभर स्वच्छ उन्ह पडले होते. किमान तापमानाचा पाराही १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. मंगळवेढ्यासह सांगोला आणि पंढरपूरमध्ये १७ अंश सेल्सिअसची नोंद झाली.सायंकाळनंतर मात्र या सर्व ठिकाणी तापमान बऱ्यापैकी कमी झाले

सचिन सावंत मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *