सेना भवन येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.15, सिल्लोड येथील शिवसेना पक्ष कार्यालय सेना भवन येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा.गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, डॉ.मॅचिंद्र पाखरे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संचालक नरसिंग चव्हाण, नॅशनल सूतगिरणी चे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, नगरसेवक सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, जितू आरके, संजय आरके, संजय मुरकुटे,शेख इम्रान ( गुड्डू ), सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड ,फारूक पठाण आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
सिल्लोड प्रतिनिधी
शेख चाँद