सिहोरा घाटातुन रेती चोरून नेणारा ट्रॅकटर पकडला
नागपूर कन्हान : – नदीच्या सिहोरा घाटातुन रेती चोरी करून अवैध वाहतुक करणार्या बिना नम्बर ट्रॅक्टर ट्रॉली ला कन्हान पोलीसांनी रात्री गस्तीवर असताना पकडुन पाच लाख तीन हजार रूपयांचा माल जप्त करून कार वाई करण्यात आली.
कन्हान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उप निरिक्षक महादेव सुरजुसे सह पोलीस कर्मचारी रात्री गस्तीवर असताना कन्हान नदीच्या सिहोरा रेती घाटातुन बिना नम्बर ट्रॅकटर ट्रालीत चोरीच्या रेतीची अवैध वाहतुक करताना पांधन रोड हनुमान नगर कन्हान येथे पकडुन फिर्यादी सचिन सलामे यांच्या तक्रारा वरून कलम ३७९ , १०९ भादंवी नुसार गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर चालक रोशन सेवर लोंढे वय २८ वर्ष रा. पंचशी लनगर सत्रापुर कन्हान याला अटक केली. त्याच्या ताब्यातुन एक ब्रास रेती ३,००० रू व बिना नम्बर ट्रॅक्ट र, ट्राली किंमत ५ लाख रूपये असे एकुण ५ लाख ३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात सहा उपनिरिक्षक महादेव सुरजुसे, जोसेफ, मुकेश वाघाडे, संजु बदोरिया, जितेन्द्र गावंडे, साचिन सलामे हयानी करून पुढील तपास करित आहे.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535