सामुहिक कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी आवश्यक उपस्थिती मर्यादा पाळा अन्यथा गंभीर कारवाई – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आदेश आदेशाचे उल्लंघन झाल्यास जागा मालकांना 20 हजारपर्यंत दंड व गुन्याे ची नोंद कार्यक्रम आयोजक देखील रु.10 हजार दंडास पात्र संबंधित क्षेत्राचे पोलीस ठाणे प्रमुखांची परवानगी बंधनकारक
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20210220-WA0025.jpg)
चंद्रपूर – सद्यास्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता, लग्न व इतर तत्सम कार्यक्रमासाठी असलेली 50 व्यक्तींची मर्यादा कायम ठेवण्यात येवून नाटक व सिनेमा या व्यतिरिक्त होणाऱ्या इतर सभा, बैठका, सामुहिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमात संबंधित बंदिस्त सभागृह व मोकळ्या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के अथवा 100 व्यक्ती यापैकी जे कमी असेल त्या क्षमतेने लोकांच्या उपस्थितीत कोव्हीड विषयक नियमांचे पालन करण्याचे अटीवर कार्यक्रम करावे. तथापि, असे कार्यक्रम ज्या ठिकाणी संपन्न होतील त्याचे मालक, व्यवस्थापकांनी सदर कार्यक्रमाची पूर्व परवानगी संबंधित क्षेत्राचे पोलीस ठाणे प्रमुख यांचेकडून घेणे बंधनकारक राहील, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज निर्गमित केले आहेत.
संबंधित पोलीस ठाणे प्रमुख यांनी सदर कार्यक्रमस्थळी एक पोलीस शिपाई यांची मास्क व सामाजिक अंतर पाळण्याची अंमलबजावणी करण्याकरिता नेमणूक कराण्याचेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.उक्त निर्देशांचे उल्लंघन केल्यास साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थान कायदा यामधील तरतूदी अन्वये संबंधित सभागृह, मंगल कार्यालय, लॉन, जागा यांचे मालक अथवा व्यवस्थापक यांचेवर पाच हजार दंड आकारण्यात येईल. सदर आदेशाचे दुसऱ्यांचा उल्लघन झाल्यास रु. 10 हजार दंड व तिसऱ्यांदा रु. 20 हजार- याप्रमाणे दंड आकारण्यात येईल. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार सदर सभागृह, मंगल कार्यालय अथवा जागा सिल करणे व गुन्हा दाखल करणे यासारखी कारवाई देखील करण्यात येईल. तसेच कार्यक्रमाचे आयोजक हे सुध्दा सदर उल्लंघनासाठी रु. 10 हजार इतक्या दंडास पात्र राहतील.
सदर कारवाई करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी सक्षम राहतील, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर