सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 13 जण हद्दपार प्रांताधिकारी शिंगटे यांची कारवाई, तासगाव पोलिसांचे संचलन
Summary
राजू थोरात तासगाव प्रतिनिधी तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक २०२०-२०२१ च्या अनुषंगाने 13 जणांच्या वर हद्दपारीचीीी कारवाई मिरजेचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी समीर शिंदे यांनी केली आहे. निवडणुका असणाऱ्या गावांमध्ये तासगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी बैठका घेऊन उमेदवार पॅनल […]

राजू थोरात तासगाव प्रतिनिधी
तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक २०२०-२०२१ च्या अनुषंगाने 13 जणांच्या वर हद्दपारीचीीी कारवाई मिरजेचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी समीर शिंदे यांनी केली आहे. निवडणुका असणाऱ्या गावांमध्ये तासगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी बैठका घेऊन उमेदवार पॅनल प्रमुख व जनतेशी संवाद साधला. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव पोलिसांनी सशस्त्र संचलन करीत कायदा मोडणार्याची गय केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
याबाबत पत्रकारांशी बोलताना तसेच पोलिस निरीक्षक सावंत्रे म्हणाले तासगांव पोलीस ठाणे हद्दीतील एकुण ३९ गावा पैकी ३६ गावामध्ये निवडणुक होत असल्याने संवेदनशील गावे मधील उपद्रवी लोकांच्याविरुध्द कडक कारवाई करणेत आलेली आहे. फौजदारी प्रक्रिया सहिंता कायदा कलम १०७,११० प्रमाणे -३९५ केसेस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ५५.५६.५७ प्रमाणे -०२ लोकावर हद्दपार प्रस्ताव दारु विक्री करणारे लोकाच्याविरुध्द एकुण ११ प्रस्ताव पाठविणेत आलेले आहेत.
सर्व सामान्य नागरीकांचे हित लक्षात घेऊन सन २०२१ ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे उद्देशाने दिनाक १४/०१/२०२१ रोजी ते दिनाक १८.०१.२०२१ रोजीचे अखेर तासगांव तालुक्याचे कार्यक्षेत्रात प्रवेश करु नये. म्हणुन क्रि. प्रो. को. क १४४ (२) प्रमाणे १३ लोकाना मनाई आदेश मा.उपविभागीय दंडाधिकारी साो मिरज विभाग मिरज यांनी काढलेले आहेत. दिनाक १५.०१.२०२१ रोजी मतदान प्रक्रिया व दिनाक १८.०१.२०२१ रोजी निकालाच्या वेळी शांतते व्हावे याकरीता कोणी कायदा हातात घेईल त्याचेवर कडक कारवाई केली जाईल. असा इशारा
राजेंद्र सावंत्रे यांनी दिला
फोटो ओळ
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तासगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संचलन केले