BREAKING NEWS:
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो! खते विक्रीबाबत केंद्र शासनाचे नवे निर्बंध, शेतकऱ्यांना महिनाकाठी मिळणार ‘एवढे’ पोती खत

Summary

केंद्र शासनाच्या सबसिडीवरील रासायनिक खते आता शेतकऱ्यांना महिनाकाठी फक्त 50 पोतीच घेता येणार आहेत. खते विक्रीबाबत केंद्र शासनाने नवे निर्बंध लागू केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले. शेतकऱ्यांना अत्यंत गरजेचे असलेले युरिया, डीएपी […]

केंद्र शासनाच्या सबसिडीवरील रासायनिक खते आता शेतकऱ्यांना महिनाकाठी फक्त 50 पोतीच घेता येणार आहेत. खते विक्रीबाबत केंद्र शासनाने नवे निर्बंध लागू केले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना अत्यंत गरजेचे असलेले युरिया, डीएपी या रासायनिक खतांवर केंद्र सरकार सबसिडी देते. त्यामुळे या खतांच्या किमती कमी आहेत.

बागायती शेतकऱ्यांना सतत रासायनिक खतांची गरज भासते तर कोरडवाहू शेतकरी खरीप व रब्बीच्यावेळीच ही खते खरेदीसाठी दुकानांवर गर्दी करताना दिसून येतो.

पण तरीही पाच एकर शेती असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही खते खरेदी करताना दिसून आले आहेत. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांनाच सबसिडी असणाऱ्या खतांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनाने खरेदीवर पहिल्यांदाच निर्बंध लागू केले आहेत.

केंद्र सरकारच्या रसायन व फर्टीलायझर मंत्रालयाचे संचालक निरंजन लाल यांनी याबाबत गुरूवारी आदेश पारीत केला आहे. या आदेशान्वये एका शेतकऱ्याला एका महिन्यात खतांच्या फक्त ५0 पोती खरेदी देता येतील.

ज्यांचे प्लॉन्टेशन आहे त्यांच्यासाठी ही मर्यादा २00 पोती असेल. खते खरेदीवर अशी पहिल्यांदाच मर्यादा घालण्यात आली आहे.

या नव्या निर्बंधामुळे शेतकऱ्यांची अडचण होणार नाही असे चित्र आहे. कोणतेही शेतकरी महिन्यात 50 पोती खताचा वापर करीत नाहीत. मोठे बागायतदार की ज्यांच्याकडे उस मोठ्या प्रमाणावर आहे अशा शेतकऱ्यांना मात्र खताचा डोस टप्प्या टप्याने द्यावा लागणार आहे

सचिन सावंत मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *