महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेनं भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचं संभाजीनगर केलं.

Summary

मुंबई | शिवसेनेनं भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचं संभाजीनगर केलं. हे नामांतर लोकांनी स्वीकारलं. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपस त्याची काळजी नको, असं म्हणत शिवसेनेनं सामनामधून भाजपवर टीका केलीये.औरंगाबाद शहराचे […]

मुंबई | शिवसेनेनं भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचं संभाजीनगर केलं. हे नामांतर लोकांनी स्वीकारलं. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपस त्याची काळजी नको, असं म्हणत शिवसेनेनं सामनामधून भाजपवर टीका केलीये.औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळय़ा फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे, असं म्हणत काँग्रेसच्या या भूमिकेचा संबंध महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी जोडणं मूर्खपणाचं आहे, असं स्पष्टीकरण शिवसेनेनं दिलं.महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱयांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील.औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला.
नवी मुंबई न्युज रिपोटर
प्रशांत मानसिंग जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *