महाराष्ट्र

विदर्भ खैरे कुणबी समाज बांधवांची धामनी येथील पीडित कुटुंबाला सांत्वन भेट

Summary

अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमणे, कुटुंबास आर्थिक मदत व मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलण्यासाठी उपविभागीय अधिकारी, वणी यांचेमार्फत शासनाला निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाणे अंतर्गत मौजा धामणी येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी विदर्भ खैरे […]

अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमणे, कुटुंबास आर्थिक मदत व मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलण्यासाठी उपविभागीय अधिकारी, वणी यांचेमार्फत शासनाला निवेदन
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाणे अंतर्गत मौजा धामणी येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी विदर्भ खैरे कुणबी समाज बांधवांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे असे सांगत त्यांचे सांत्वन केले. यावेळी समाज बांधवांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, त्यासाठी सरकारी वकील नेमणे, पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी तसेच मुलीच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा. इत्यादी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी वनी, जिल्हा यवतमाळ, यांचेमार्फत शासनाला पाठवण्यात आले आह. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून सुद्धा यापूर्वीच दखल घेतलेली आहे. आणि तशा प्रकारचा अहवाल पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडून आयोगाने मागितला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील धामणी येथे एका 40 वर्षीय नराधमाने चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात घडली. आरोपी पांडुरंग भडके या 40 वर्षीय नराधमाने घरी कुणी नाही हे बघून चिमुकलीवर अत्याचार केला या घटनेचा संपूर्ण विदर्भातून निषेध होत आहे.
मारेगाव तालुक्यातील धामणी गावातील या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नुकतीच राळेगाव, यवतमाळ, वरोरा, हिंगणघाट, वनी, समुद्रपूर, राळेगाव, नागपूर ,सेलु येथील कुणबी समाज बांधवांनी मौजे धामणी येथे जाऊन पीडित कुटुंबाचे भेट घेतली.झालेली घटना गंभीर स्वरूपाचे असून पंधरा दिवस होऊनही सदर पीडित कुटुंबा अद्यापही या घटनेतून सावरलेले नाही त्यांच्यात मानसिक दुर्बलता आल्याचे दिसून दिसून आले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे सदर कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, सदर मुलीच्या शिक्षणाचा खर्च व नोकरीची जबाबदारी शासनाने उचलावी तसेच सदर मागण्यांचा निकाल लागेपर्यंत आरोपीला जमानतीवर सोडण्यात येऊ नये, तसेच आरोपीस कठोर शिक्षा व्हावी म्हणून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी समाजबांधवांनी उपविभागीय अधिकारी वणी मार्फत शासनाला केली आहे.

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *