विजेचा धक्का बसून सहा प्रवासी ठार! रस्ता चुकल्या ने घडला विचित्र अपघात
राजस्थान मधील जालोर जवळ एका विचित्र अपघातात बसला विजेचा धक्का बसून सहा प्रवासी ठार झाले आहेत तर 20 जण जखमी झाले आहेत त्यातील 7 जण गंभीर जखमी आहेत अशी माहिती जालोरच्या जिल्हाधिकारी नी दिली.
शनिवारी रात्री उशिरा मार्ग चूकलेली बस जालोर जिल्ह्यातील महेशपुरा गावाजवळ ही बस आलेली असताना रस्त्यावर लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेला काठीच्या साह्याने वर उचलून बस पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात होता.
बसचा किन्नर बस वर चढून तार उचलून घेत असताना ती सटकली आणि किन्नर च्या गळाला अडकली वीज प्रवाह सुरू असल्याने कान्नरचा तर मृत्यू झालाच परंतु विज प्रवाह बस मध्ये उतरल्याने आतील प्रवाशांना ही विजेचा धक्का बसला
जालौरच्या जिल्हाधिकारी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की या दुर्घटनेत सहा प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून सात गंभीर जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे याशिवाय अन्य तेरा प्रवाशांनवर स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क