वांगणीत खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंधबांधवान सोबत साजरी केली दिवाळी…
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201116-WA0059.jpg)
खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंधबांधवान सोबत साजरी केली दिवाळी… 450 अंध बांधवाना दिवाळी निमित्ताने फराळ,राशन आणि साहित्याचे वाटप… वांगणी : अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात ४०० च्या वर अंध कुटुंब वास्तव्यास आहेत. हे अंध बांधव लोकलमध्ये गाणी म्हणून, काही वस्तू विकून आपला उदरनिर्वाह चालवतात.मात्र करोनाच्या संकटामुळे हे अंध बांधव मोठ्या अडचणीत आले. मात्र त्यावेळी शिवसेना त्यांच्या मदतीला धावून आली होती , मात्र आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या अंध बांधवांची दिवाळी आनंदाची जावी या साठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला.आज श्रीकांत शिंदे यांनी या अंध बांधवान सोबत दिवाळी साजरी केली.यावेळी खा.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून वांगणी येथील 450 अंधबांधवांना दिवाळीच्या निमित्ताने रेशन, दिवाळीचं संपूर्ण साहित्य, फराळ देण्यात आले. तसेच लॉक डाऊन च्या काळात वांगणी मधील काजल भालेराव , उषा विकी काजबे या 2 अंध भगिनींना प्रसूती साठी पैसे नव्हते त्यावेळी शिंदे यांनी त्यांना आर्थिक मदत केली , त्यामुळे त्या भगिनींची प्रसूती व्यवस्थित पार पडली , आज दिवाळीचे औचित्य साधून या अंध भगिनींच्या 2 नवजात मुलींना ,चंदेरी पैंजन, जोडावे , आणि कपडे अशी अनोखी दिवाळी भेट दिली , या प्रतिकूल परिस्थिती आलेली दिवाळी श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने खूप आनंद देऊन गेली अशी भावना या अंध बांधवानी व्यक्त केली , तसेच या अंध बांधवाना साठी हक्काची बाजार पेठ उपलब्ध करून देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले
जगदीश जावळे
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य