लोकांचे मनात पक्षाविषयी आस्था निर्माण करणे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी
Summary
जयंत पाटील काटोल/कोंढाळी – लोकांच्या मनात पक्षाविषयी आस्था निर्माण करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. पक्षाने मोठ्या अपेक्षा ठेऊन आपल्याला पदे दिलेली असतात त्याप्रमाणे आपण रिझल्ट द्यायला हवा. पक्षाच्या विश्वासाला खरे उतरणे ही आपली जबाबदारी असते असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
जयंत पाटील
काटोल/कोंढाळी – लोकांच्या मनात पक्षाविषयी आस्था निर्माण करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. पक्षाने मोठ्या अपेक्षा ठेऊन आपल्याला पदे दिलेली असतात त्याप्रमाणे आपण रिझल्ट द्यायला हवा. पक्षाच्या विश्वासाला खरे उतरणे ही आपली जबाबदारी असते असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काटोल येथील राष्ट्रवादी परिवार संवाद बैठकीत केले.
तर!नामदार-अनिल देशमुख यांनी ,सांगितले की ज्या राजकीय पार्टी चे पक्ष संगठन मजबूती तो पक्ष आणि ती पार्टी मजबूत असते। या करीता गावों गावी तसेच शहरी भागातील वार्ड , प्रभागातील कार्यकर्त्यांची फळी ची उभारणी गरजे चे आहे, सोबतच बुथ निहाय नियोजन ही मजबूत असावे असे मार्गदर्शन या प्रसंगी काटोल विधान सभेचे आमदार व राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद प्रसंगी केले *
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्यासह संवाद साधला. विधानसभा निवडणुकीआधी याच ठिकाणी सभा झाली होती. त्यावेळी आम्ही महाराष्ट्रभर शिवस्वराज्य यात्रा काढली होती. लोकांनी त्यावेळी मोठ्या उत्साहात स्वागत केलं होतं. त्याचप्रमाणे निवडणुकीमध्ये इथल्या लोकांनी भरभरून प्रेम करत अनिलबाबूंना निवडून दिले त्याबद्दल ना. जयंत पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शरद पवार साहेबांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार राज्यात आलं. आपल्या काटोलमधील नेत्याला पवार साहेबांनी महत्त्वपूर्ण खाते देऊन गृहमंत्री केले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत, मालाला आधारभूत किंमत मिळावी ही त्यांची मागणी आहे, पण केंद्र सरकारला वेळ असला तरी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची इच्छा नाही, अशी टीका त्यांनी केली. दोन महिने शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणारे शेतकरी २६ जानेवारीला गोंधळ का घालतील, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारचा पाठिंबा आहे. राज्यात अतिवृष्टी झाली तेव्हा तिजोरीत खडखडाट असतानाही सरकारने शेतकऱ्याला मदत केली आहे, आणि कोणत्याही संकटकाळात सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील, असा दिलासा त्यांनी दिला. तसेच आपल्या सरकारच्या काळात जास्तीत जास्त लोकांच्या समस्यांची सोडवणूक करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवार वाढवा, असे आवाहन ही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, माजी आमदार प्रकाश गजभिये, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी काटोल विधान सभा मतदार संघा तील सर्व नव निर्वाचित ग्रा प सदस्यांचा सत्कार तर काटोल तालुक्यातील खुर्सापार ग्रामपंचायत व नरखेड तालुक्यातील येणिकोणी ग्राम पंचायतीचा विषय सत्कार करण्यात आला । हे विषेश!