BREAKING NEWS:
महाराष्ट्र

लोकप्रतिनिधींच्या प्रश्नावरील अनुपालन शंभर टक्के पूर्ण करा  – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत जिल्हा नियोजन समितीवरील कार्यकारी समितीचा आढावा

Summary

नागपूर, दि. 21 : जिल्हा नियोजन समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या अनुपालनाचा शंभर टक्के अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात यावा. तसेच यावर्षीच्या नियोजनातील प्रत्येक विभागाचा खर्च पूर्ण होईल, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी गंभीरतेने लक्ष घालण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. जिल्हा […]

नागपूर, दि. 21 : जिल्हा नियोजन समितीच्या यापूर्वीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या अनुपालनाचा शंभर टक्के अहवाल पुढील बैठकीत सादर करण्यात यावा. तसेच यावर्षीच्या नियोजनातील प्रत्येक विभागाचा खर्च पूर्ण होईल, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी गंभीरतेने लक्ष घालण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.

जिल्हा नियोजन समितीची सभा पुढील महिन्यात प्रस्तावित आहे. त्यामुळे गेल्या  बैठकीतील अनुपालन अहवाल, नवीन वर्षासाठीचे प्रस्ताव, जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण पुनर्विनियोजन, जिल्हा वार्षिक योजनेचे सर्वसाधारण प्रारुप, आराखडा 2021-22 संदर्भातील आढावा, घेण्यासाठी पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कार्यकारी समितीची सभा आज घेण्यात आली. या सभेत प्रत्येक विभागाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवर चर्चा करण्यात आली. तसेच पुढील 3 महिन्यात हा निधी खर्च करण्यासंदर्भात प्रत्येक विभागाला विचारणा करण्यात आली.

कोरोनामुळे गेल्या मार्चपासून अनेक कामे प्रभावित झाली आहे. त्यामुळे पुनर्विनियोजन करताना अल्प काळामध्ये हा निधी खर्च करण्याबाबत विभागनिहाय चर्चा यावेळी करण्यात आली.

पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या सोबतच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, तसेच नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर बैठकीस उपस्थित होते. यावेळी या अधिकाऱ्यांनी अनेक विभागाचा आढावा घेताना ताळमेळ न जमणाऱ्या खर्चाची रक्कम वेळेआधीच समर्पित करण्याच्या सूचना दिल्या.

 नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे यांनी प्रत्येक विभागाला आपल्या संभाव्य खर्चासाठी केलेल्या नियोजनाबाबत विचारणा केली. पुढील महिन्यात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तत्पूर्वी 20 जानेवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीतील कार्यपालन अहवालही यावेळी सादर करण्यात आला. पालकमंत्री डॉ. राऊत यांनी 100% अनुपालन अहवाल पूर्ण झाला पाहिजे. बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती दिली गेली पाहिजे असे निर्देशित केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *