*राज्यमंत्र्यांच्या सहविचार सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नी ‘प्रहार’ च्या मागण्यांची विशेष दखल*…!
Summary
३० डिसेंबर २०२० रोजी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ना.बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेत शिक्षकांच्या विविध प्रश्नी राज्यातील प्राथमिक,माध्यमिक खाजगी व जिल्हा परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा मुंबई येथील बालभवन येथे पार पडली.यावेळी शिक्षण विभागातील वरिष्ठ सनदी […]
३० डिसेंबर २०२० रोजी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री तथा प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ना.बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेत शिक्षकांच्या विविध प्रश्नी राज्यातील प्राथमिक,माध्यमिक खाजगी व जिल्हा परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा मुंबई येथील बालभवन येथे पार पडली.यावेळी शिक्षण विभागातील वरिष्ठ सनदी अधिकारी ,प्राथमिक शिक्षण संचालक ,मुंबई विभागाचे उपसंचालक तथा संबंधीत विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार शिक्षक संघटनेनी सभेपुर्वी सादर प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी केलेल्या शिक्षक समस्येच्या निवेदनाची विशेष दखल घेऊन संबंधित प्रश्नांच्या अनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य त्या कार्यवाहीबाबत निर्देश दिलेत.लवकरच या सर्व प्रश्नी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
प्रहार शिक्षक संघटनेच्या मागणीत पवित्र पोर्टल वरील शिक्षक भरती पूर्वी आंतरजिल्हा बदली टप्पा- १०% अट वगळून राबविण्यात यावे ,आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिये करिता सुधारित धोरण तात्काळ जाहीर करणे,आंतरजिल्हाकरिता पोकळबिंदू अथवा राज्य रोस्टरचा अवलंब करणे, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे , समान न्याय तत्वाने सर्व जिल्ह्यांमध्ये विषय शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून वेतन श्रेणी लागू करणे , आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देने , वस्तीशाळा,अप्रशिक्षित शिक्षकांना त्यांच्या मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतन श्रेणी करिता ग्राह्य धरणे, संचमान्यता दुरुस्ती, वरिष्ठ- निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करणे या संबंधाने संक्षिप्त चर्चा झाली.आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित धोरण जाहीर करणेपूर्वी अभ्यास गटाने सादर केलेल्या अहवाल संबंधी ग्रामविकास स्तरावर संघटनेची चर्चा बैठक आयोजित करणे,शिक्षण सेवकांच्या मानधनात तात्काळ वाढ करून त्यांना आर्थिक पाठबळ देने, स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत अप्रशिक्षित,वस्तीशाळा शिक्षकांची नियुक्ती दिनांक पासूनची सेवा वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरणे,राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना तात्काळ लागू करण्यात यावी,समान न्याय तत्वानुसार सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद मधील कार्यरत विषय शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून वेतनश्रेणी लागू करणे,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षे सेवे पश्चात शिक्षक कर्मचारी यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे,आंतर जिल्हा बदलीचा पाचवा टप्पा सुरू करने,रखडलेली विस्तार अधिकारी , केंद्रप्रमुख ,उच्चश्रेणी मुख्याध्यापक , पदवीधर शिक्षक यांची पदोन्नती प्रक्रियेबाबत तात्काळ कार्यवाही करणे,प्राथमिक शिक्षकांनी उच्च शैक्षणिक अर्हता धारण केल्यामुळे त्यांना उच्च शैक्षणिक अर्हतेची वेतन श्रेणी लागू करण्यासह महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग- १ व २ मध्ये मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरविणे तसेच पदोन्नतीची संधी देणे,जिल्हांतर्गत बदली चे सर्वसमावेशक धोरण तात्काळ तयार करून अतिदुर्गम भागातील शिक्षकांना या धोरणात बदली करिता प्राधान्य देणे.रोटेशन पद्धतीचा अवलंब करणे.यामध्ये आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनाकापासूनची सेवा ग्राह्य धरणे,MS-CIT संगणक अर्हता धारण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देऊन संबधित आर्थिक वसुली बंद करणे.,जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच सद्यस्थितीत DCPS/NPS मध्ये येणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना केंद्रशासन, राजस्थान, आसाम आणि उत्तराखंड च्या धर्तीवर कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करणे.
नगरपालिका शिक्षकांच्या वेतनाचे १०० टक्के अनुदान इतर व्यवस्थापन संवर्गिय शिक्षकांप्रमाणे मान्य करून नियमित वेतन अदा करणे,.
कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद न करणे.बैठकी प्रसंगी मांडण्यात आल्यात.या सर्व समस्यांचे निवेदन राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने सादर करण्यात आले.या निवेदनाची दखल घेत राज्यमंत्री ना.बच्चभाऊ कडू यांनी शिक्षण विभागाच्या उपस्थित अधिकारी यांना कार्यावहीचे निर्देश देऊन यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता शालेय शिक्षण, ग्रामविकास, अर्थ, नगर विकास आणि माहिती तंत्रज्ञान या संबंधित विभागांची एकत्रित बैठक यथाशिघ्र लावण्याचे निर्देशही ना. बच्चुभाऊ कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत बैठकीला प्रहार शिक्षक संघटनेचे औरंगाबाद जिल्ह्याचे खाजगी सेल चे अध्यक्ष श्री.दीक्षांत गजभिये व नागपूर विभागाचे संपर्क प्रमुख श्री.देवेंद्र हुलके प्रामुख्याने उपस्थित होते असे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे व सरचिटणीस विनोद लांडगे यांनी प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.