BREAKING NEWS:
महाराष्ट्र राजकीय

राजकीय ब्रेकिंग! आमदार भांगडिया कुटुंबियांना राजस्थानमध्ये अटक…

Summary

चंद्रपुर- महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पोलिसांशी दादागिरी केल्याप्रकरणी आमदार कीर्तिकुमार भांगडिया तसेच वडिलांसह काही जणांविरूद्ध शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. दुपारी […]

चंद्रपुर- महाराष्ट्रातील चिमुरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये सालासर हनुमान पाहायला जात होते. रॉंग साईड वाहन टाकून पोलिसांशी दादागिरी केल्याप्रकरणी आमदार कीर्तिकुमार भांगडिया तसेच वडिलांसह काही जणांविरूद्ध शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

दुपारी बाराच्या सुमारास बसचालक सीकरजवळ भटकंती करून शहरात शिरला. शहरातील एसके हॉस्पिटल जवळ ट्रॅफिक महिला पोलिस कमला आणि हेडकॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनी बस थांबविली. तेथे हेड कॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनीही बस चालकाच्या जड वाहनात शहरात प्रवेश बंदी केल्याप्रकरणी 500 रुपयांचे चालान कापले.

वाहनांची चौकशी केली असता, माझ्या बसची चौकशी का करता मी महाराष्ट्राचा आमदार आहे. माझ्या वाहनांची तपासणी करायची नाही असे म्हणून राजस्थान पोलीसासोबत कीर्तिकुमार भांगडियायांनी हुज्जत घालायला सुरुवात केली .तेव्हा आमदार बंटी भांगडीया यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्दीला हात लावत हातापायी झाल्याची चर्चा सुरू आहे. इतकेच नव्हे तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्या सोबत अश्लील शब्दात शिवीगाळ करून धमकी दिली.

या भांडणात हेडकॉन्स्टेबल गिरधारीसिंगचा गणवेश फाडून त्यांच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. याामुळे आमदार कीर्ति कुमार, मितेश भांगडिया यांना शांततेचा भंग करण्यात आली. महिला कॉन्स्टेबल कमला यांच्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *