BREAKING NEWS:
महाराष्ट्र

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

Summary

मुंबई, दि. ९ : –  रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९  करिता 2 कोटी 75 लाख 92 हजार 821  रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वर्षा […]

मुंबई, दि. ९ : –  रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९  करिता 2 कोटी 75 लाख 92 हजार 821  रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

 रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द केला. रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी या निधीसाठी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे.

 मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदींचे या योगदानासाठी आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुकही केले आहे. कोविड-१९ विषाणूमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अशा रितीने एकत्र होणारा निधी, गरजूंच्या उपचारासाठी मदतीचा हातभार ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19

मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

 सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *