मोहाडी तालुक्यातील कुशारी गावात वाचनालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न.
मोहाडी- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याच्या कुशारी गावातील तरुण विद्यार्थ्यांनी संघटित होऊन वाचनालय सुरू केले. वाचनालयाचा उद्घाटन सोहळा ०५ नोव्हेंबरला संपन्न झाला.
वाचन संस्कृती लोप पावत आहे, अशी एकीकडे बोंब असताना कुशारी या छोट्याशा गावात तरुण विद्यार्थ्यानी संघटित होऊन वाचनालय सुरु केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामसेवक फटकाळ मॅडम, तलाठी समरीत मॅडम, मुरलीधरजी गायधने सरपंच ग्रा.पं. कुशारी व इतर ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अमित खोब्रागडे, प्रास्ताविक राहुल गायधने तर विशाल सुरजजोशी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम समरीत, शुभम गायधने, श्रीहरी गायधने, शैलेश कापसे, अक्षय गायधने व गावातील तरुणांनी सहकार्य केले.
न्यूज रिपोर्टर-
अमित खोब्रागडे
तालुका मोहाडी
९८६०२९८२४७