BREAKING NEWS:
महाराष्ट्र

मुल ते चिचाळा मार्गावर दोन दुचाकींचा अपघात दोन जागीच ठार तर तीन जखमी

Summary

मुल:- दोन मोटार सायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात दोन ठार आणि तीन जखमी झाल्याची घटना आज दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान मूल ते ताडाळा मार्गावरील महाबिज केंद्रा जवळ घडली. मृतकाचे नाव स्वप्नील दिवाकर गुज्जनवार, वय 28, रा.रामपूर – मूल आणि […]

मुल:- दोन मोटार सायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात दोन ठार आणि तीन जखमी झाल्याची घटना आज दुपारी अकरा वाजताच्या दरम्यान मूल ते ताडाळा मार्गावरील महाबिज केंद्रा जवळ घडली. मृतकाचे नाव स्वप्नील दिवाकर गुज्जनवार, वय 28, रा.रामपूर – मूल आणि रविंद्र कावळे, वय-23, रा.गडीसूर्ला असे आहे. जखमी मध्ये लोभान नामदेव रामटेके, वय 28,रा.केळझर,अनिल हरिश्चंद्र झरकर, वय 25,रा फुटाणा चक,चंद्रशेखर निकूरे, वय-22, रा.गडीसूर्ला, असे आहे. यापैकी दोघांना गंभीर जखमी असल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते.दरम्यान,चंद्रपूर येथे उपचारानंतर रविंद्रचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, स्वप्नील दिवाकर गुज्जनवार आणि लोभान रामटेके हे दोघे एम एच 34 आर एफ 4537 या मोटार सायकलने मूल वरून ताडाळा येथे काही कामानिमित्त जात होते. त्यावेळेस पाणीपुरवठयाचे काम करणारे गडीसूर्ला येथील चंद्रशेखर निकूरे,रविंद्र कावळे आणि फुटाणा येथील अनिल झरकर हे तीघेजण एम एच 34,बी 9711 या एकाच मोटार सायकलने मूल कडे येत होते. या दोन्ही मोटार सायकलची समोरासमोर जोरदार भीषण धडक बसली. त्यात स्वप्नीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर गंभीर जखमी झालेल्या रविंद्र कावळे याचा चंद्रपूर येथे उपचारानंतर मृत्यू झाला. अपघातात दोन्ही मोटार सायकलची चांगलीच दृर्दशा झाली. जखमींना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.चंद्रशेखर निकूरे हा गंभीर जखमी असल्याने याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत मूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. पुढील तपास प्रभारी पोलिस निरिक्षक ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक डोंगरे,पोलिस हेड कॉन्स्टेबल शेंडे, श्रीधर मडावी हे करीत आहेत.

विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *