मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Summary
मुंबई, दि. 19 : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. […]
मुंबई, दि. 19 : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.
मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या रूपाने भारताला एक कणखर आणि धुरंधर नेतृत्व लाभले होते. त्या मुत्सद्दी राजकारणी तर होत्याच पण त्यांनी भारतीय जनतेच्या मनात विकासाभिमुख नेतृत्व म्हणून स्थान मिळवले होते. युद्ध, दुष्काळ, पूर अशा आपत्तींना तोंड देण्यासाठीही त्यांनी नवीन योजना आखल्या. त्यांच्या धडाडीमुळे आणि निर्णय क्षमतेमुळे भारताची जागतिक पातळीवर ताकदवान देश अशी प्रतिमा निर्माण झाली. भारतमातेच्या महान सुपुत्री दिवंगत इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.