BREAKING NEWS:
महाराष्ट्र

महाशिवरात्रीबाबद……. महाराष्ट्र शासन ,महसूल व वनविभाग आपत्ती मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई

Summary

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेल्या आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हनून घोषित केला आहे.तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूमुळे (कोविड१९) चां प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३/०२/२०२० पासून लागू करून खंड २,३, व ४ मधील तरतुदीनुसार […]

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेल्या आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हनून घोषित केला आहे.तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूमुळे (कोविड१९) चां प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.१३/०२/२०२० पासून लागू करून खंड २,३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.त्याबाबदची नियमावली तयार करण्यात आलेली आहे.त्याशिवाय आरोग्य मंत्रालय त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात लोकांनी येऊ नये ,तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थाबने,चर्चा करणे,काही कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या विषाणूच्या संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्याचे आरोग्यास धोकादायक होत असल्याची या कार्यालयाची खात्री झालेली आहे.याकरिता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
ज्याअर्थी दिनांक११/०३/२०२१ रोजी महाशिवरात्री निमित पोलिसस्टेशन आधळगाव अंतर्गत मोजा गायमुख त.तुमसर जिल्हा भंडारा.तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त ०५ दिवसापर्यंत यात्रा भरत असते.सदर यात्रेमध्ये दरवर्षी यात्रा कालावधीत दररोज एक ते दीड लाख भाविक दर्शना करिता जिल्यातून तसेच बाहेरील राज्यातून भाविक पोहे घेऊन ( नवस फेडण्यासाठी) मुक्कामी येत असतात .त्यामुळे गर्दीचे स्वरूप हे मोठ्याप्रमाणात निर्माण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही .
सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव असल्याने रुग्णाची संख्या कमी होताना दिसून येत असावी तरी सुद्धा गायमुख व जिल्ह्याच्या ठिकाणी महाशिवरात्री यात्रा भरल्यास सामाजिक अंतराचे पालन होण्यास अडसर निर्माण होऊन कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदर यात्रेचे आयोजन केल्यास कोरोना विषाणूच्या संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस त्याचे आरोग्य हानिकारक राहील त्या अनुसांगणे सदर यात्रा भरविणे उचित होणार नसल्याचे पोलिस अधीक्षक भंडारा यांनी संदर्भ क्र.०२ अन्वय या कार्यालयास कळविले आहे.संदीप कदम जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडारा ,आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वय प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करून भंडारा जिल्ह्यात दिनांक ११/०३/२०२१ पासून ते ०५ दिवसापर्यंत मौजा गायमुख झिरी,भातदाडी, नेरला, कोरंभी, चुलबंद , नदिघाट ,गडकुंभली ,तुडमापुरी, उमरी, वटटेकर,शिवणीटोला,वलमझरी,भंडारा,हत्तिजेई, चंद्रपूर,मुरली, गोबरवाही , घुटेरा,राजापूर, खुमारी, किटालि, गराडा, गुडरी,मोगरा शिवणी तसेच जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणी जिथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते.सर्वयात्रा रद करण्याचे याद्वारे आदेशित करीत आहेत.
सदर आदेशाचे पालन न करणारी उल्लघटन करणारी कोणतीही व्यक्ती संख्या अथवा समूह यांनी साथरोख प्रतिबंध कायदा १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार अपराध केला असा मानन्यात येईल . व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

  1. स्वार्थी करमकार
    महिला प्रतिनिधी
    तालुका तुमसर
    swarthikar74@gmail.com
    7350176781
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *