महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड पुणे चे संचालक सर्जेराव शिंदे यांची दि गडचिरोली नागरी पतसंस्थेला व जिल्हा पतसंस्था संघाला सदिच्छा भेट.

Summary

जिल्हा गडचिरोली वार्ता:- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड पुणे चे संचालक श्री सर्जेराव शिंदे यांनी नुकतीच गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली आणि जिल्हा पतसंस्था संघाला भेट देऊन विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी दि.गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल […]

जिल्हा गडचिरोली वार्ता:- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड पुणे चे संचालक श्री सर्जेराव शिंदे यांनी नुकतीच गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली आणि जिल्हा पतसंस्था संघाला भेट देऊन विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी दि.गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री व संचालक दिलीप उरकुडे यांच्याशी त्यांनी सध्या पतसंस्थेतर्फे राबवित असलेल्या विविध योजना, कर्ज वाटप, कर्ज व्याजदर, ठेवीवरील व्याज दर, सी डी रेशो, कर्जवसुली, इत्यादी विषयावर विस्तृत चर्चा केली यावेळी पतसंस्थेच्या प्रगतीबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
तसेच सोबतच नागरी व पगारदार सहकारी पतसंस्था संघ मर्यादित गडचिरोलीचे अध्यक्ष श्री दिलीप खेवले व मानद सचिव प्रा. शेषराव येलेकर यांचेशी संघाच्या कामकाजाविषयी चर्चा करून संघाचे संलग्नित असलेल्या पतसंस्थांचे कर्ज वसुली साठी , वसुली अधिकारी यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 156 चे अधिकार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली कडून प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करण्यात यावा जेणेकरून संलग्न संस्थांची कर्जवसुली होऊन संघाला उत्पन्न प्राप्त होईल.
कर्ज वसुलीचे अधिकार प्राप्त करण्याकरिता काही अडचणी आल्यास प्रत्यक्ष संपर्क साधावा मी लगेच वरिष्ठांशी संपर्क साधून सदर समस्या तात्काळ मार्गी लागेल असे आश्वासन त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले.

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *