महाराष्ट्र

मंगळवेढ्यात 35 लाखांचे सोने चोरणारा वाळू माफिया ‘शेजाळ’ पोलीसांच्या जाळ्यात, LCB ची धडाकेबाज कामगिरी

Summary

मंगळवेढ्यात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली असून आरोपी (Sarveshwar Damu Shejal) सर्वेश्वर दामू शेजाळ, वय 35 वर्शे रा. गोणेवाडी ता. मंगळवेढा हल्ली रा.दुर्गा माता नगर मंगळवेढा याला पस्तीस लाखाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी […]

मंगळवेढ्यात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली असून आरोपी (Sarveshwar Damu Shejal) सर्वेश्वर दामू शेजाळ, वय 35 वर्शे रा. गोणेवाडी ता. मंगळवेढा हल्ली रा.दुर्गा माता नगर मंगळवेढा याला पस्तीस लाखाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि.१० जानेवारी २०२१ रोजी संजय महादेव आवताडे रा.खंडोबा गल्ली मंगळवेढा यांच्या नविन घराची वास्तूशांतीचे कार्यक्रम असल्याने विनायक माधवराव यादव (वय.४१ वर्षे),रा.मारापूर ता.मंगळवेढा हे सहकुटुंब आले होते.

त्याच दिवशी आवताडे यांचे घरी , तामदर्डी ता. मंगळवेढा येथील रंगसिध्द देवाची पालखी आली होती.विनायक यादव व त्यांचे नातेवाईक हे कार्यक्रमाकरीता आल्यानंतर नवीन घराच्या पहिल्या मजल्यावर थांबले होते. सदर वास्तूशांतीच्या कार्यक्रमाकरीता आलेले नातेवाईक व घरातील लोक हॉलमध्ये जमले होते.

दुपारी 12ः00 वा. च्या दरम्यान रंगसिध्द देवाची आरती चालु झाल्याने, आरतीसाठी फिर्यादी व इतर नातेवाईक घाईगडबडीने सोबत आणलेली बॅग व इतर साहित्य आहे त्या परिस्थितीत सोडून खालच्या हाॅलमध्ये आरतीसाठी गेले.

आरती झाल्यानंतर फिर्यादी हे त्यांचे पाहुण्यारावळयांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर, जेवण करून पहिल्यामजल्यावर आले असता, त्यावेळी त्यांनी आणलेल्या बॅगेची चैन उघडी दिसली, बॅग चेक केली असता, बॅगेतील सोन्याचे दागिने असलेले पाउच दिसून आले नाही. त्यांनी सदर पाउच हे संपूर्ण बॅगेत व रूममध्ये शोधले ते सापडले नाहीे.

सदरचे पाउच हे चोरीस गेले असल्याची त्यांची खात्री झाली, तसेच त्यांचे नातेवाईक संजय महादेव आवताडे यांनी त्यांचेही काही सोने चोरीस गेले असल्याचे समजले म्हणून यातील फिर्यादी विनायक यादव यांच्या फिर्यादीवरून
मंगळवेढा पोलीस ठाणेस गुरनं 17/2021 भादंविकाक 380 प्रमाणे दि.12 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाची उकल होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली व स्थागुशाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि रवींद्र मांजरे व त्यांचे पथक आरोपीच्या मागावर होते.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून गुन्हयाच्या घटनास्थळी एल.सी.बी.च्या पथकाने भेट देवून सदर ठिकाणचे व्हिडिओ शुटिंग व सी.सी.टी.व्ही. कॅमेरा याची तपासणी केली. त्यावरून एक अनोळखी संशयित इसम हा त्यादिवशी घरामध्ये वावरत असल्याचे दिसले,

सदर इसमाने घातलेले कपडे, उजव्याहाताती दो-याचा गोफ, डाव्या हातातील घडयाळ, केसाचा मश्रूम कट, शरिरयष्टी इ. माहिती घेतली असता, सदरचा इसम हा सर्वेश्वर दामू शेजाळ गोणेवाडी ता. मंगळवेढा येथीलच राहणारा असून तो सध्या दुर्गामाता नगर मंगळवेढा येथील पवार यांचे घरात भाडयाने राहवयास असल्याचे समजले.

सदरचा इसम हा मंगळवेढा येथील दामाजी चैकात थांबला असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली. दामाजी चैकात जावून त्यास ताब्यात घेतले. त्यास प्राप्त सी.सी.टी.व्ही. फूटेज व व्हिडिओ रेकाॅडिंग दाखविले असता त्यातील इसम मीच असल्याचे त्याने सांगितले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषगाने विचारपूस करता त्याने सुरवातीस उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला, त्यावरून त्याचा संशय आल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपूर्ण अथक तपास केला असता, त्याने सांगितले की, वास्तूशांतीच्या दिवशी त्यांचे घरी जावून पालखीचे व सत्यनारायणाचे दर्षन घेवून, पहिल्या मजल्यावरील बेडरूम मध्ये गेलो होतो,

तेथे असलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने असलेले पाउच व पैशाची पर्स चोरी केल्याचे सांगितले.

चोरलेले सोन्याचे दागिने व पैसे गोणेवाडी ता. मंगळवेढा येथे जावून शेतातील बांधावर खड्डे करून पुरून ठेवल्याचे सांगितले. त्याने गोणेवाडी ता. मंगळवेढा येथील शेतातील बांधावर पुरून ठेवलेले दागिने व पैसे काढून दिले. त्याचेकडून सोन्याचे नेकलेस, पोहे हार, गंठन, बाजूबंद, पाटल्या, बांगडया, कडा, अंगठया, कानातील लटकन, टाॅप्स, झालर, कानातील बाळी, नथ, सोन्याचे बिस्कीट इ. असा एकूण 859 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजन व रोख रक्कम 10 हजार 160 रू असा एकूण 35 लाख 26 हजार 160 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता मंगळवेढा पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले असून गुन्हयाचा पुढील तपास पोनि गुंजवटे मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहे.

सदर आरोपी हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरूध्द मुंबई येथे चोरीचा गुन्हा दाखल असून तसेच मंगळवेढा पोलीस ठाणे येथे वाळू चोरीचे व दारू बंदी कायदयाखाली गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलीस हवालदार,नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय जगदाळे,मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गुंजवटे व त्यांचा स्टाफ यांनी बजावली आहे

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *