मंगळवेढ्यात बर्ड फ्ल्यू चा शिरकाव ! दहा किलोमीटर चा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित
मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील पोल्ट्री फार्म मधील 9 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे या पक्षाचा मृत्यू बर्ड फ्ल्यू या सदृश रोगाणे झाल्याचे निश्चित झाले आहे त्यामुळे खबरदारी ची उपाययोजना म्हणून जंगलगी पासून दहा किलोमीटर चा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित केला आहे .
सोलापूर चे जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत चे आदेश आज काढले आहेत.राज्यात परभणी व लातुर या बर्ड फ्ल्यू दाखल झाल्यानंतर पोल्ट्री व्यवसायामध्ये भितिचे वातावरण पसरले आहे.
मंगळवेढा तालुक्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाने सर्व पोल्ट्री फार्म परिसरातील कोंबड्यांची नियमित तपासणी करावी
कोंबड्यांचा मृत्यू आढळल्यास नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी कुक्कुट पालकांनी मेलेल्या कोंबड्यांचा किंवा आजारी पक्षाची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकार्यांना व नियंत्रण कक्षाला द्यावी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचा-यांनी सर्व पोल्ट्री फार्म परिसरातील कुक्कुट पालन करनार या शेतकऱ्यांच्या भेटी देऊन पक्षांची संख्या पक्षांमधील मृत्युची संख्या याची माहिती घ्यावी.
याबाबत सात दिवसाच्या कालबाह्य कार्यक्रमाची आखणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क