मंगळवेढ्याच्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्याला बेड्या, हॉटेलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकालाच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये सुरु असलेला हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला.
एका पोलिस निरीक्षकासह 6 जणांना अटक करण्यात आली. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात कर्नाळ रोडवरील ‘हॉटेल रणवीर’वर छापा टाकून पोलिसांनी कारवाई केली.अटक केलेल्या आरोपींमध्ये आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, हॉटेल मालक, एजंट यांचाही समावेश आहे. हॉटेलमधील छापेमारीत दोन तरुणीही सापडल्या. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.
वेश्या अड्ड्यावर पोलिस निरीक्षकाला अटक झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पिटा (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक) कायद्यानुसार हॉटेलवर कारवाई करण्यात आली. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडून दोन कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. 14 वर्षांच्या मुलीला मॉडेलिंगचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप दोघांवर आहे. अंधेरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750