मंगळवेढा राष्ट्रवादीत गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले जाणार; कोण म्हणाले Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त
Summary
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचा आणि शरद पवार यांनी दिलेल्या शिकवणीचा आदर करणाऱ्या तालुक्यातील अनेकांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली जाईल याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे असे तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी भारत बेंद्रे यांची मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचा आणि शरद पवार यांनी दिलेल्या शिकवणीचा आदर करणाऱ्या तालुक्यातील अनेकांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली जाईल याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे असे तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी भारत बेंद्रे यांची मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या यामुळे तालुका कार्यकारणी निवडण्यास निवडणुकांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक झाले होते.
यावर आता बेदरे यांनी वरिष्ठांच्या परवानगी यांनी सर्वसमावेशक अशी नूतन कार्यकारणी करणार असल्याचे सांगितले.
पक्षाशी प्रामाणिक असणारे आणि पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्याने कार्यकारणी मध्ये समाविष्ट केले जाणार असणार असून अनुभवी व नवीन अशा दोन्ही कार्यकर्त्यांना कामाची संधी दिली जाणार आहे.
मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी संपुष्टात आणून गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले जाईल
येणाऱ्या काळात सहकारी संस्थांच्या विधानसभेच्या विविध निवडणुकांना म्हणून सामोरे जात असताना पक्षाच्या आदेशानुसार काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क