मंगळवेढा ब्रेकिंग! दिलीप बिल्डकॉनच्या टिपरने घेतला तरुणाचा बळी, एकजण जखमी

मंगळवेढा-सांगोला रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या दिलीप बिल्डकॉनच्या टिपरने पाठीमागून दुचाकीस्वरास धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी 11 च्या सुमारास घडली आहे.
अंकुश भारत दोलतोडे (वय.22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.तर माऊली हणमंत ढाणे (वय.25,दोघे राहणार मेटकरी गल्ली,मंगळवेढा) हा जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत अंकुश दोलतोडे व जखमी माऊली ढाणे हे सांगोला रोडवरून कामाला जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दिलीप बिल्डकॉन(डी.बी.एल) या कंपनीच्या टिपरने दुचाकीस्वारास पाठीमागून जोराची धडक दिली.
यामध्ये अंकुश दोलतोडे याचा जागीच मृत्यू झाला आहे तर माऊली ढाणे हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750