भूमिपुत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांच्यावर हल्ला !
चंद्रपूर : भूमिपुत्रा ची हाक चे संपादक राजू कुकडे यांच्यावर आज वरोरा येथे हमला करण्यात आला. राजू कुकडे यांनी यासंदर्भात वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून आरोपी तांवर 323, 504 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू कुकडे यांनी नुकताच फेसबुकवर यासंदर्भात व्हिडिओ रिलीज केला असून त्यामध्ये त्यांनी कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याकरवी हा हमला करण्यात आल्याचा आरोप केला आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभावर अशा पद्धतीच्या हमला करणे, ही बाब घृणास्पद आहे. यासंदर्भात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध पत्रकार संघटना तर्फे होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, दोन-तीन दिवसांपूर्वी नागपूर येथे काँग्रेसच्या आयोजित कार्यक्रमात खास. बाळू धानोरकर यांनी पक्षश्रेष्ठी आदेश देत असेल तर आपण वाराणसी इथून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहोत, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करण्यात आले. यासंबंधातील वृत्त राजू कुकडे यांनी भूमिपुत्रांची हाक या न्यूज प्रकाशित केले. त्याच्याच राग ठेवून आज त्यांच्यावर हा हमला करण्यात आला असा आरोप त्यांनी सोशल माध्यम माध्यमांच्या माध्यमातून केला. त्यांच्या मते, “माझ्यावर आज खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात बातमी लिहिली असल्याचे समजून त्यांच्या तीन गुंडाकडून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला त्या संदर्भात मी वरोरा पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल केली असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा माझ्या सहकाऱ्यांनी दिला आहे. खासदार बाळू धानोरकर यांची दादागिरी आता ठेचून काढण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र याव असे मी आव्हान करतो.” असे आव्हान त्यांनी सोशल माध्यमांवर केले आहे. आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हे लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच आहे. लोकशाहीच्या मार्गाला तिलांजली वाहून गुंड प्रवृत्तीच्या माध्यमातून हमला करणे ही बाब चुकीची आहे. लोकशाहीचे चार स्तंभ पैकी महत्वाचे एक स्तंभ असलेले “मिडीया”वर झालेला हल्ला लोकशाहीसाठी घातक आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर