महाराष्ट्र

भिलगाव येथे जलस्वराज्य योजने अंतर्गत पिण्याचे पाणी व नळ कनेक्शन त्वरीत उपलब्ध करून द्यावे ….

Summary

जिल्हा नागपूर (कामठी) वार्ता:- भिलगाव येथे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या करीता शासनातर्फे भिलगाव, खसाळा, कवठा अशी 3 गावे मिळून संयुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने 21 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना 2016 साली मंजूर करण्यात आली या प्रकल्पा अंतर्गत […]

जिल्हा नागपूर (कामठी) वार्ता:- भिलगाव येथे नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या करीता शासनातर्फे भिलगाव, खसाळा, कवठा अशी 3 गावे मिळून संयुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने 21 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना 2016 साली मंजूर करण्यात आली
या प्रकल्पा अंतर्गत गावात पाणीपुरवठाच्या 4 अत्याधुनिक जलकुंभ निर्माण करण्यात आले व संपूर्ण गावात पाइप लाइनचे काम पूर्ण झाले आहे.
या जलस्वराज्य योजनेअंतर्गत गावातील काही नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आलेले आहेत,
मात्र दुसरा टप्पा अंतर्गत नवीन वसाहतीतील नागरिकांना नळ कनेक्शन मिळालेले नाही त्यासाठी स्थानीय वंचित नागरिक ग्रामपंचायत च्या पायऱ्या झिजवत आहे नळ कनेक्शन मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे यामुळे नागरिकांना गंभीर आजार होण्याचा धोका बळावला आहे या संदर्भात ग्राम पंचायत भिलगाव येथे चौकशी केली असता दुसरा टप्पातील नळ कनेक्शन साठी आकारण्यात येणारी रक्कम वाढीव केली असुन ग्रामपंचायत येथील काही सदस्य आर्थिक लोभापोटी बहुमताच्या जोरावर नळ कनेक्शन रेंगाळत ठेवत असल्याची चर्चा स्थानिक ग्राम पंचायत मध्ये दबक्या आवाजात करीत आहे
भिलगाव मधील नवीन वसाहतीचा नागरिकांना पहिल्या टप्प्यात ठरलेल्या दरानेच नळ कनेक्शन देऊन पाणी पुरवठा करण्यात यावा व या कामात दिरंगाई करणारा अधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांचा वर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन खंडविकास अधिकारी गराटे मॅडम यांना देण्यात आले या विषयाची सदर तक्रारची प्रतीलिपी पालकमंत्री डॉ नितीन राऊत राज्यमंत्री सुनील केदार कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना देण्यात आली त्यावेळी स्थानीय नळ योजना कनेक्शन वंचित नागरिकाकडून प्रतिनिधित्व करणारे नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव निखील फलके भिलगाव चे माजी उपसरपंच चंद्रकांत फलके, भिलगाव काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खिमेश बढिये, इमरान खान, अनिकेत शेळके उपस्थित होते

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *