भाजपा तर्फे हल्लाबोल आंदोलन राज्यसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करित विजबिलाची केली होळी.
Summary
कन्हान : – महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवुन महाराष्ट्रातील ४ कोटी गोरगरीब जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ भाजपा कन्हान व पारशिवनी तालुका व्दारे हल्लाबोल आंदोलन करून राज्यसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करित विजबिलाची केली होळी करण्यात […]
कन्हान : – महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवुन महाराष्ट्रातील ४ कोटी गोरगरीब जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ भाजपा कन्हान व पारशिवनी तालुका व्दारे हल्लाबोल आंदोलन करून राज्यसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करित विजबिलाची केली होळी करण्यात आली.
शुक्रवार (दि.५) ला भाजपा कन्हान व पारशिवनी तालुक्याच्या व्दारे कन्हान येथील महावितरण कार्याल या समोर भाजपा जिल्हा महामंत्री अविनाशजी खळत कर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यात भाजपा तालुकाध्यक्ष अतुल हजारे, भाजपा नेते शंकर राव चहांदे, राजेश ठाकरे, रामभाऊ दिवटे, जि प सद स्य व्यकटेश कारेमोरे, न प विरोधी पक्ष गटनेता राजेंद्र शेंदरे, सरिता लसुंते, स्वाती पाठक, लक्ष्मी लाडेकर, कामेश्वर शर्मा, संजय चोपकर, गुरुदेव चकोले, शेखर गिऱ्हे, रानु शाही, अजय लोंढे, प्रमोद वंजारी, शैलेश शेळके, सौरभ पोटभरे, लोकेश अंबाळकर, विलास लसुंते, सुनिल साखरे, मालु ठाकरे, माया राऊत, कविता पाली सह पदाधिकारी, सदस्यांंच्या उपस्थित महावितरण अभियंता उपविभागीय कार्यालय कन्हान हयाना निवेदन देऊन लॉकडाऊन काळातील जनतेचे विधृत बिल कमी करण्याची मागणी करण्यात आली.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535