BREAKING NEWS:
महाराष्ट्र

पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने महिलांना घेऊन युवा स्वाभिमान पार्टी चा मोर्चा धडकणार

Summary

2 डिसेंबर 2020 रोजी युवा स्वाभिमानी पक्ष चंद्रपूर तर्फे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात बेरोजगार व असंघटित कामगार यांच्या मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला होता परंतु त्यावर जिल्हा प्रशासनाने निर्णय पावले न उचलल्याने युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी […]

2 डिसेंबर 2020 रोजी युवा स्वाभिमानी पक्ष चंद्रपूर तर्फे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात बेरोजगार व असंघटित कामगार यांच्या मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला होता परंतु त्यावर जिल्हा प्रशासनाने निर्णय पावले न उचलल्याने युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी आज दिनांक 4 जानेवारी 2019 रोजी थेट जिल्हाधिकारी श्री गुल्हाने यांची भेट घेऊन त्यांच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याबाबत त्यांनाच निवेदन दिले.

युवा स्वाभिमानी पक्ष चंद्रपूर यांच्याद्वारे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये युवा स्वाभिमानी पक्षातर्फे केलेल्या मागण्यांपैकी पहिली मागणी म्हणजे पालकमंत्री चंद्रपूर हे पालकमंत्री म्हणून योग्य नाहीत तथा पालकमंत्र्यांनी बेरोजगारांना व असंघटित कामगरांना न्याय देण्याचे सोडून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेली दारू बंदी हटविण्यात करता आपली पूर्ण ताकत लावली आहे. हे अत्यंत चुकीचे असून यामुळे हजारो घरे बरबाद होतील त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपली ताकद ही चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरता व असंघटित कामगारांना न्याय देण्याकरिता वापरावी असे सांगितले आहे.

तथा जिल्ह्यामध्ये कोरोना काळामध्ये पोलीस प्रशासनाने अत्यंत उत्तम पणे जिल्हा बंदी पाळली व जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तथा लोकांची योग्यपणे माहिती आपल्या जवळ ठेवली, अशाच पद्धतीची यंत्रणा पोलीस प्रशासन दारूबंदी गुटखा बंदी बाबत का राबवत नाही ?

असा सवाल या निवेदनातून विचारण्यात आला आहे व अशीच यंत्रणा दारूबंदी व गुटखा बंदी बाबत वापरल्यास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी यशस्वी करण्यामध्ये चंद्रपूर पोलीस प्रशासन व प्रशासन सफल होईल अशी अपेक्षा त्यांच्याकडून या निवेदनामध्ये युवा स्वाभिमानी पक्ष चंद्रपूर यांनी ठेवलेली आहे.

याशिवाय जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून रेती चोरी, कोंबडा बाजार, जुगार, याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली परंतु स्थानिक पोलिसांकडून या सर्व गोष्टींना पाठबळ देण्यात येत असल्याने जिल्ह्यांमध्ये अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत.

त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद आहे व पालकमंत्र्यांनी घोषित केल्या प्रमाणे ज्या पोलिस निरीक्षकांच्या हद्दीमध्ये अवैध धंदे दिसतील त्यांना निलंबित करण्याचे काम पालकमंत्र्यांनी करावे अशी मागणी युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी एका निवेदनातून जिल्हाधिकारी विजय गुल्हाने यांना केली आहे.

सदर मागण्यांबाबत 19 जानेवारी 2021 पर्यंत प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्यास 20 जानेवारी 2021 रोजी हजारो महिलांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी या निवेदनातून दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *