पाथरी गावात चोरी
राजेश उके
न्युज रिपोर्टर/तुमसर तालुका
तुमसर तालुक्यातील पाथरी गावातील कुशलदास तुकाराम गोंडाणे (73)यांच्या शेतातील विहरीवरील चालु स्थितीत असलेला मोटार पंप, फुटबॉल पाईप व सेक्शन पाईप असा पन्नास हजार किंमतीचा सामान अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेला आहे. नाकाडोंगरी परिसरात मोटार पंप चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे, ह्या अगोदरहि नाकाडोगरी, आष्टी, बावनथडी, लोभी, धुटेरा, कवलेवाडा येथे मोटार पंप चोरट्यांच्या घटना घडल्या. हि रिपोर्ट गृहमंत्रालय गेली आहे. सर्व प्रसार माध्यमांचा ह्या घटनेकडे लक्ष केंद्रित केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मैसकर साहेब, बिट जमादार घोळंके व सिपाही जाईभाई करत आहे