BREAKING NEWS:
महाराष्ट्र

*पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांना लाच घेताना अटक*

Summary

पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे हे ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. सेवापट व एलपीसीसाठी लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अचानक झालेल्या या कारवाईने रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी वर्गामध्ये खळबळ उडालीआहे. आज (शुक्रवार, २९ जानेवारी) दुपारी […]

पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे हे ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. सेवापट व एलपीसीसाठी लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अचानक झालेल्या या कारवाईने रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी वर्गामध्ये खळबळ उडालीआहे.
आज (शुक्रवार, २९ जानेवारी) दुपारी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. रायगड जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश इंगोले यांची यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली. तेथे तो कार्यरतही झाला. बदलीच्या वेळी गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी इंगोले यांनी पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे साबळे यांनी पैसे मागणे थांबवले.

        उमेश इंगोले यांची यवतमाळ येथे बदली झाली असली तरी काही कागदपत्रांची पूर्तता करणे बाकी होते. त्यासाठी पुन्हा पैशांची मागणी सुरू झाली. लास्ट पेमेंट स्लीप देण्यासाठी साबळे यांनी त्याच्याकडे १० हजारांची मागणी केली. म्हणून इंगोलेने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. गेले दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक साबळे यांच्या मागावर होते. अखेर आज रायगड जिल्हा परिषदेत सापळा रचून साबळे त्यांना लाचेची रक्कम घेताना पकडण्यात आले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू केली आहे. एसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक साळे, कर्मचारी दीपक मोरे, सूरज पाटील, कौस्तुभ मगर, स्वप्नाली पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. 

✍️प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *