नेते प्रकाश आंबेडकर यांच्या रविवारी झालेल्या मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
Summary
ग्राम खरवंडी कासार(पाथर्डी):- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत रविवारी भगवानगडाच्या पायथ्याशी खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे दसऱ्याच्या निमित्ताने खरवंडी येथे ऊसतोडणी कामगार संघटना, मुकादम, वाहतूकदार यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. यांच्यावर गुन्हा दाखल : ऊसतोड कामगार […]
ग्राम खरवंडी कासार(पाथर्डी):- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत रविवारी भगवानगडाच्या पायथ्याशी खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे दसऱ्याच्या निमित्ताने खरवंडी येथे ऊसतोडणी कामगार संघटना, मुकादम, वाहतूकदार यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यांच्यावर गुन्हा दाखल : ऊसतोड कामगार संघटनेचे दादासाहेब खेडकर, शिवराज बांगर, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिक बारसे, अरुण जाधव, अनिल जाधव, अमित भूईगल, संदीप शिरसाठ यांच्यासह इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला
करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जमावबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत.
मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होऊन मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती झाली असल्याचे देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सदर फिर्यादीवरून मेळाव्याच्या आयोजकांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतेही सोशल डिस्टन्स पाळले नव्हते म्हणून पंकजा मुंडे यांच्यासहदेखील 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजन कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
8169048053