महाराष्ट्र राजकीय

नूतन वर्षानिमित्त आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून जनतेला शुभेच्छा

Summary

मुंबई, दि. 31 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यातील जनतेला नूतन वर्ष आरोग्यदायी आणि आनंददायी जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 2020 मध्ये कोविड-19 या जागतिक महामारीच्या विरोधात संघर्ष करावा लागला. या संघर्षात डॉक्टर्स, नर्स, […]

मुंबई, दि. 31 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यातील जनतेला नूतन वर्ष आरोग्यदायी आणि आनंददायी जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

2020 मध्ये कोविड-19 या जागतिक महामारीच्या विरोधात संघर्ष करावा लागला. या संघर्षात डॉक्टर्स, नर्स, आशा स्वयंसेविका, आरोग्य, पोलिस यंत्रणा, अत्यावश्यक सेवेतील सर्वच अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक कोविड योद्ध्यांनी मोठे योगदान दिले.  संकट अजूनही टळलेले नाही, मात्र खबरदारी हाच एकमेव उपाय असून सर्व नियमाचे पालन करुन 2021 या नवीन वर्षात मार्गक्रमण करूया, असे राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी म्हटले आहे.

अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *