BREAKING NEWS:
महाराष्ट्र

नागपुर विभाग पदविधर मतदानास तालुक्यातील कन्हान व पारशिवनी केन्द्र सज्ज.

Summary

कन्हान : – नागपुर विभाग पदविधर मतदार संघाची होऊ घातलेली निवडणुक मंगळवार दि.१ डिसेंबर २० २० रोजी पार पडणार असुन पारशिवनी तालुका अंर्त गत एकुण २ मतदान केंद्रात पुरुष ४१८, महिला ३४५ व इतर १ असे एकुण तालुक्यात ७६४ पदविधर […]

कन्हान : – नागपुर विभाग पदविधर मतदार संघाची होऊ घातलेली निवडणुक मंगळवार दि.१ डिसेंबर २० २० रोजी पार पडणार असुन पारशिवनी तालुका अंर्त गत एकुण २ मतदान केंद्रात पुरुष ४१८, महिला ३४५ व इतर १ असे एकुण तालुक्यात ७६४ पदविधर मतदा र आहेत. मतदान प्रक्रीया शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याकरिता जवळपास ५० अधिकारी, कर्मचा-यां ची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसि लदार वरूणकुमार सहारे यांनी दिली.
पाराशिवनी तालुक्यातील कन्हान परिसरातील भाग क्रमांक २२ चे सर्व पदविधर मतदार जिल्हा परिषद केद्रियं शाळा कन्हान-पिपरी खोली क्र.१ मध्ये मतदान करणार आहे. या मतदान केन्दात पुरुष २१६ , महिला १९४ व इतर १ असे एकुण ४११ पदविधर मतदार आपले मतदानचे हक्क बजावणार आहे. पारशिवनी मतदान केन्द्र क्रमांक भाग ८ मध्ये पारशिवनी व नवे गाव खेरी परिसरातील मतदार तहासिल कार्यालय खोली क्र.१ यात पुरूष २०२ व माहिला १५१ असे एकुण ३५३ पदविधर मतदार पाराशिवनी तहसिल कायालयातील केंद्रात मतदानाचा हक्क बजावणार आहे. पारशिवनी तालुक्यातील दोन्ही मतदान केंद्रात पुरूष ४१८, महिला ३४५ व इतर १ असे एकुण ७६४ पदविधर मतदार आपले मतदान सकाळी.८ ते सायं काळी ५ वाजेपर्यंत चालणार असुन प्रत्येक मतदान केंद्रात १ केंद्राधिकारी ३ कर्मचारी कार्यरत असणार आहेत.१ पुरुष व १ महीला पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. कन्हान व पाराशिवनी मतदान केंद्रासाठी दोन क्षेत्रीय अधिकारी कर्तव्य पार पाडणार आहेत. हे मतदान ई.व्ही.एम. मशीन ऐवजी मत पत्रिके द्वारे होणार असुन मतदारांनी मतदान करतांना निवड णुक आयोगाने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन नेच क्रमांक टाकणे अनिवार्य आहे. टाकलेला क्रमांक आकड्यांतच असावा अक्षरी नसावा तसेच मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर 1 क्रमां क टाकणे अत्यावश्यक आहे. एकापेक्षा अधिक क्रमां क टाकु नये, तसे केल्यास ते मतदान ग्राह्य धरल्या जा णार नाही. या शिवाय कोरोना च्या पार्श्वभुमीवर प्रत्येक मतदाराची थर्मल स्कॅनिंग केली जाणार असुन सॅनिटा यझरचा वापर करण्यात येणार आहे. दोन मतदारांत ६ फुटांचे अंतर राखणे बंधनकारक आहे. मास्क लावल्या शिवाय मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मतदान करण्यासाठी महीला, पुरुष व जेष्ठ नाग रिकाना, दिव्यांगासाठी वेग वेगळ्या तिन रांगा लावण्या त येणार आहे. मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कन्हान व पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी, होम गार्ड तैनात केले जाणार आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *