नवीन कामठी पोलिसांनी दिले सहा गोवंश जनावरांना जीवनदान…..
कामठी वार्ता:
एका आरोपीच्या अटकेसह 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त…..
नागपूर ….:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी गुमथळा मार्गावरील स्मशान घाटाच्या च्या मागील एका मोकळ्या जागेत आरोपीने काही गोवंश जनावरे अवैधरित्या पायी वाहतूक करोत बंदिस्त करून कत्तलीसाठी नेणार असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या इंटेलिजन्स पथकाला मिळताच पोलिसांनी त्वरित आज दुपारी 1 वाजे दरम्यान धाड घालून कत्तलीसाठी बंदिस्त असलेल्या 6 गोवंश जनावरांना ताब्यात घेत त्यांची सुटका करीत नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून सहा गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही करोत या धाडीतून सहा गोवंश जनावरे अंदाजे 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करोत एका आरोपीवर कायदेशीर रित्या गुन्हा नोंदवून अटक करण्यात आले असून अटक आरोपीचे नाव फिरोज खान शेख गफ्फार वय 32 वर्षे रा फुटाना ओली कामठी असे आहे.
ही यशस्वी कारवाही डी सी पी निलोत्पल , एसीपी मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनार्थ इंटेलिजन्स पथकाचे डी आर कुमरे, मंगेश गिरी, वेदप्रकाश यादव, आशिष भुरकुडे,प्रमोद वाघ, श्रीकांत विष्णुरकर यांनी पार पाडले असून पुढील तपास सुरू आहे.
✍🏼दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी