दुर्गापूर खुल्या खाणीजवळ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक इसम ठार…

चंद्रपुर: वेकोलिच्या दुर्गापूर खुल्या खाणीजवळ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना सोमवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घडली. दुर्गापुर येथील नरेश वामन सोनवणे (४० )हा इसम वेकोलिच्या दुर्गापूर खुल्या खाण परिसरातील सेक्टर ५ मधून जात होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करीत त्याच्या नरडीचा घोट घेतला.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर