BREAKING NEWS:
महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनात आदरांजली

Summary

मुंबई, दि. ६ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्‍हे आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुष्पहार […]

मुंबई, दि. ६ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  विधान भवनाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्‍हे आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सभापतींचे सचिव महेंद्र काज आदिंसह विधानभवनातील अधिकारी व कर्मचा-यांनीही गुलाबपुष्प अर्पण करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *