डुमरी शिवारात दोघाना मारहाण करून लुटले
नागपूर (कन्हान) : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील डुमरी वस्ती शिवारात दुचाकीच्या दोघाना तिन लोकांनी येऊन मारहाण करून त्याच्या जवळील दोन मोबाईल, सोन्याच्या बाळया व नगदी असा २४ हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने घेऊन पसार झाले. कन्हान पोलीसानी तीनही आरोपीना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला.
गुरूवार (दि.५) ला ८.३० वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गवरील डुमरी वस्ती शिवारातील पेट्रोलपंप च्या जवळपास महामार्गावर फिर्यादी निशांत विष्णु झोडे वय ३३ वर्ष रा भरत नगर नागपुर हे लघवी करिता थांबले असता यातील आरोपीनी संगनमत करून फिर्यादी व त्याची मैत्रिणीला मारहाण करून त्यांचे जवळील दोन मोबाईल किंमत १८ हजार रू, सोन्याच्या दोन बाळया कि. ६ हजार रू व नग़दी ८०० शे रूपये असा एकुण २४ हजार ८०० रू पयाचा मुद्देमाल तिन आरोपीने बळजबरीने लुटुन नेले . फिर्यादीने कन्हान पोलीस स्टेशनला माहीती देताच पोलीसानी घटस़्थळी पोहचुन विचारपुस करताना एका आरोपीचा मोबाईल फोन खाली पडलेला मिळुन आल्याने कन्हान पोलीसानी उशीरा रात्रीच आरोपी १) दिनेश मिथीलाप्रसाद तिवारी रा खदान न ३, २) अमित प्रतापसिंह चौहाण रा कांद्री , ३) संदिप उर्फ मोनु रामकृपाल नायक रा कांद्री हयाना ताब्यात घेत त्याचे जवळुन ५ मोबाईल कि.४६ हजार रू नगदी ८०० रू व गुन्हयात वापरलेले मोटार सायकल कि.५० हजार रू असा एकुण ९६ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून (दि.६) ला आरोपी विरूध्द कलम ३९४ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस स्टेशन निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात पोउपनि सुरजुसे पुढील तपास करित आहे. ही कार्यवाही पोहवा येशु जोसेफ, नापोशि कृणाल पारधी, राजेंद्र गौतम, राहुल रंगारी , पोशि सुधिर चव्हाण, मुकेश वा़घाडे, संजय बरोदिया, शरद गिते हयांनी यशस्वि करून आरोपीना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
९५७९९९८५३५