ट्रॅक्टर ट्रालीसहीत पुलावरून कोसळला. गावकऱ्यांच्या सतर्क ते मुळे चालक बचावला
Summary
मंगळवेढा तालुक्यात आॅक्टोबंर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बावची येथील ओढ्यावरील पुलाची एक बाजू वाहुन गेल्यामुळे हा पुल धोकादायक बनला होता. परंतु यांच्या दुरुस्ती केडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रालीसहीत पुलावरून खाली कोसळला यात चालक ग्रामस्थांच्या […]
मंगळवेढा तालुक्यात आॅक्टोबंर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बावची येथील ओढ्यावरील पुलाची एक बाजू वाहुन गेल्यामुळे हा पुल धोकादायक बनला होता.
परंतु यांच्या दुरुस्ती केडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रालीसहीत पुलावरून खाली कोसळला यात चालक ग्रामस्थांच्या सतर्क ते मुळे बचावला असुन त्यास किरकोळ दुखापत झाली आहे.
आॅक्टोबंर महिन्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे नुकसान झाले..
यात मंगळवेढापाठकळ – खुपसंगी – मंगळवेढा ते बोराळे मंगळवेढा-खोमनाळ -निबोणी निबोणी-पौट मरवडे -सलगर बु लवंगी,निंबोणी चिक्कलगी मारोळी यासह अनेक रस्त्याचे नुकसान झाले
यात सर्वात जास्त नुकसान बावची येथील पुलाचे झाले.
शिरनांदगी तलाव भरून जादा झालेल्या पावसाच्या पाण्याचे ओढ्यातील पुलाची एक बाजू वाहुन गेली . या मार्गावर साखर कारखान्याकडे जाणारी वाहतूक जास्त असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या तुटलेल्या बाजुकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले ..
पुलाच्या दुरुस्ती साठी किती बळींची वाट हे खाते पाहणार असा सवाल विचारला जात असताना बुधवारी लवंगी येथील साखर कारखान्याला ऊस भरुन जात असताना ट्रॅक्टर व एक ऊसाने भरलेली ट्राली अचानक या पुलावरील तुटलेल्या बाजुचा अंदाज न आल्याने पलटी झाली..
याच ओढ्यालगत बुधवारी गावातील एका मृतदेहावर अंत्यविधी सुरू होता . या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत ट्रॅक्टर चालकाच्या अंगावर पडलेला ऊस बाजूला काढून तेला बाहेर काढून्यात आले.
उपचारासाठी ट्रॅक्टर चालकाला दवाखान्यात पाठविण्यात आले हा चालक तालुक्यातील देगाव येथील दरम्यान या घटनेने तरी संबंधित खात्याला जाग येईल अशी विचारणा घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली..
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क