जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा ठाणे जिल्ह्यातील दौरा
Summary
जिल्हा ठाणे वार्ता:- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील भातपिकांचे नुकसान झाले असून याच अनुषंगाने आज भिवंडी, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांचा दौरा केला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी याकरिता नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे अतिजलद पद्धतीने करण्याबाबतच्या सूचना याअगोदरच प्रशासनाला देण्यात […]
जिल्हा ठाणे वार्ता:- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील भातपिकांचे नुकसान झाले असून याच अनुषंगाने आज भिवंडी, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यांचा दौरा केला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी याकरिता नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे अतिजलद पद्धतीने करण्याबाबतच्या सूचना याअगोदरच प्रशासनाला देण्यात आल्या असून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह प्रशासनातील विविध खात्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकसानग्रस्त भागांची पाहणी करीत आढावा घेतला.
याप्रसंगी शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वर्गास संबंधित शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्यासंदर्भात निर्देश दिले.
अतिवृष्टीमुळे वीज पडून जखमी झालेल्या शेतकरी बांधवांची शहापूर जिल्हा रुग्णालय येथे भेट घेत विचारपूस केली.
जगदीश जावळे
ठाणे जिल्हा