महाराष्ट्र

जनरल ड्युटी नसिऀग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा..

Summary

गडचिरोली / १६ जानेवारी २०२१ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन, ईक्सटसी बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना कौशल्य विकास आणि रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक वर्ष कालावधीच्या जनरल ड्युटी नसिऀग असिस्टंट प्रशिक्षण […]

गडचिरोली / १६ जानेवारी २०२१

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन, ईक्सटसी बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना कौशल्य विकास आणि रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक वर्ष कालावधीच्या जनरल ड्युटी नसिऀग असिस्टंट प्रशिक्षण कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण हे ॲॉनलाइन तसेच प्रत्यक्ष क्लासेसच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेची बचत करणे सोपे होणार आहे. त्यासोबतच या प्रशिक्षणामुळे आरोग्य सेवेत उंच भरारी घेण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहेत. कौशल्यावर आधारित या आधुनिक अभ्यासक्रमात बेसिक NURSING ट्रेनिंग, ANATOMY AND PHYSIOLOGY, Hospital and healthcare, nursing skills शरिरोपकृम, अभिनिवृती शारिरम, अस्थिशारिरम, लसिका संस्थान्म अस्थिपरिचय, स्नायू परिणाम,मानसशास्त्राचा शारीरिय आधार,प्रेरणा आणि भावना,मानवी क्षमता अध्ययन,या सारख्या अनेक विषयांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी १८ ते ३५ वयोगटातील युवक युवतींना आरमोरी, कुरखेडा,मुलचेरा,आलापल्ली,गडचिरोली या ठिकाणी प्रशिक्षण आणि प्रवेश दिला जाणार असून इच्छुक व पात्र विद्यार्थी यांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागद पत्रासह दिनांक ३० जानेवारी २०२१ पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन ऑफ नसिऀग , हेल्थसायंस पालोरा रोड आरमोरी ९६२३४५९६३२ /९४२१७२६७७८ जिल्हा गडचिरोली येथे नोंदणी करावी.. असे आवाहन प्रकल्प संचालक अमर राहुल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *