जननायक शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
Summary
मुंबई, दि. 15 : महान देशभक्त, थोर क्रांतिकारक, आदिवासी जननायक शहीद बिरसा मुंडा तथा ‘धरती बाबा’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी बांधवांना संघटीत करुन इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणारे शहीद बिरसा […]
मुंबई, दि. 15 : महान देशभक्त, थोर क्रांतिकारक, आदिवासी जननायक शहीद बिरसा मुंडा तथा ‘धरती बाबा’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासी बांधवांना संघटीत करुन इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र संघर्ष करणारे शहीद बिरसा मुंडा समस्त देशवासियांसाठी दैवतासमान आहेत. कोट्यवधी युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी बांधवांनी देशासाठी दिलेला लढा व पत्करलेलं हौतात्म्य सदैव स्मरणात राहील. भारतमातेच्या या महान सुपुत्रास शहीद बिरसा मुंडा तथा ‘धरती बाबा’ यांना भावपूर्ण अभिवादन. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शहीद बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491