चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला
Summary
चंद्रपूर, दि. 26 : चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 825 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाचे आरक्षणाची कार्यवाही दिनांक 29 व 30 जानेवारी रोजी रितसरपणे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचेकडून संबंधीत तहसिलदार यांना आदेशित करण्यात आले आहे. यानुसार बिगर अनुसूचित क्षेत्रातील 743 ग्रामपंचायतीकरिता अनुसूचित […]

चंद्रपूर, दि. 26 : चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 825 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाचे आरक्षणाची कार्यवाही दिनांक 29 व 30 जानेवारी रोजी रितसरपणे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचेकडून संबंधीत तहसिलदार यांना आदेशित करण्यात आले आहे.
यानुसार बिगर अनुसूचित क्षेत्रातील 743 ग्रामपंचायतीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग व 1/2 (एक व्दितीयांश) महिलासाठी सरपंच पदाकरिता आरक्षण दिनांक 29 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 2 वाजेपासून प्रत्येक तालुका स्तरांवर संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांचेकडून निश्चित करण्यात येणार आहे.
तसेच जिल्ह्यांतील राजूरा, कोरपना व जिवती तालुक्यातील पुर्णतः अनुसुचित क्षेत्रातील एकूण 82 ग्रामपंचायतीकरिता अनुसुचित जमाती व अनुसुचित जमाती महिलाकरिता सरपंच पदाचे आरक्षण दिनांक 30 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 2 वाजेपासून तालुका स्तरांवर तहसिलदार, राजूरा, कोरपना व जिवती यांचेकडून ग्रामपंचायतीकरिता सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती महिलाकरिता निश्चित करण्यात येणार आहे.
तरी याबाबत संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी कळविले आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर