महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत विधानसभा पोटनिवडणुकीची रंगीत तालीम ! नेते_कार्यकर्ते सोशल मीडिया सक्रिय

Summary

मंगळवेढा (सोलापूर):: दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पंढरीच्या नेत्यांसह मंगळवेढ्यातील नेते सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत जणू पोटनिवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाली आहे काॅग्रेसराष्ट्रवादीच्या या मतदारसंघात 2009 […]

मंगळवेढा (सोलापूर):: दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर या जागेसाठीच्या पोटनिवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पंढरीच्या नेत्यांसह मंगळवेढ्यातील नेते सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे सध्या सुरू असलेल्या
ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत जणू पोटनिवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाली आहे
काॅग्रेसराष्ट्रवादीच्या या मतदारसंघात 2009 च्या विधानसभा निवडणुकीत रिडालोस मधुन आमदार झालेले आमदार भारत भालके यांनी तीन निवडणूका वेगवेगळ्या पक्षातुन लढवल्या मुळे हा मतदारसंघ पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित मानला जाऊ लागला आणि लोकांच्या मनातील हिच नस ओळखून आमदार भालके यांनी स्वताला व पक्षाला महत्त्व न देता “जनता हाच माझा पक्ष ” हि भुमिका समोर ठेवून लोकांशी समरस होऊ लागले परंतु, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या त्यांच्या अकाली निधनामुळे भालके गटात मोठी पोकळी निर्माण झाली . तशीच पोकळी आमदार परिचारक गटात देखील निर्माण झाली . या परिवाराचे प्रमुख आधारस्तंभ दिवंगत सुधाकर पंत परिचारक यांचे निधन झाल्यामुळे या गटात मोठी पोकळी निर्माण झाल्याने दोन्ही गटात वडिलधारी नेतृत्व हरपले . पर्यायाने परिचारक गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर तर भालके गटाची जबाबदारी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व व्यंकट भालके यांच्यावर पडली . त्यामुळे दोन्ही गटाबरोबर दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचाही गट स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबर दामाजी कारखाना.कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदीविक्रि संघ या अनेक संस्था वर तसेच पंढरपुरी-मंगळवेढा तालुक्यांमध्ये प्रबळ आहे . शिवाय शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे या देखील जनतेच्या संपर्कात आहेत.
नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना या नेत्यांना कोरोनाच्या संकटात कसरत करावी लागत असली तरी देखील सध्या सुरू असलेल्या लग्नसराई, कार्यकर्त्यांच्या नवीन व्यवसायांची उद्घाटने मतदारसंघातील जनतेचे सुख – दुःखा तही भेटी देऊन त्यांच्यात समरस होत आहेत
त्यातच 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचाही समावेश आहे .
त्यामुळे पुढील काळातील तीन महिने राजकीय उलथापालथी साठी महत्व पुर्ण ठरणार आहेत .
विधानसभेच्या पोटनिवडणुकीबरोबरच दोन्ही मतदारसंघातील मोठ्या सहकारी
संथ्याच्या निवडणूका व सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी मुळे हिवाळ्यातील कडक थंडी बरोबर
निवडणुकीचे गरम वातावरण थंडी नेत्यांसह कार्यकर्त्यांना जाणवू लागल्यामुळे ते सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न समजून घेत असल्यामुळे जनतेला कोरोनाच्यासंकटातही सुखावह वाटु लागले ..
सचिन सावंत ( मंगळवेढा )
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *