गृहभेट आपुलकीची
Summary
जिल्हा गोंदिया वार्ता:- ‘गृहभेट आपुलकीची’ या संकल्पने अंतर्गत आमदार विनोद अग्रवाल गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार या नात्याने आज दि. 20 ऑक्टोबर, 2020 रोजी संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या अनुषंगाने प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोचून त्यांच्याकडून विशेष सहाय्य योजनेचे अर्ज […]
जिल्हा गोंदिया वार्ता:- ‘गृहभेट आपुलकीची’ या संकल्पने अंतर्गत आमदार विनोद अग्रवाल गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार या नात्याने आज दि. 20 ऑक्टोबर, 2020 रोजी संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या अनुषंगाने प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोचून त्यांच्याकडून विशेष सहाय्य योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले.
वृद्ध तसेच दिव्यांग व्यक्ती जे कोरोना सारख्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये घराबाहेर देखील निघू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाकडुन राबविण्यात येणाऱ्या या गृहभेट आपुलकीची ही संकल्पना कौतुकास्पद आहे. या योजनेतून सदर लाभार्थ्यांना मासिक ₹1000 अनुदान शासनाकड़ून मिळणार आहे.
यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांच्यासोबत तहसीलदार श्री. राजेश भांडारकर, नायब तहसीलदार श्री.आर. एन. पालांदूरकर, अव्वल कारकुन श्री. जि.एस. खान आणि आमदार विनोद अग्रवाल यांचे मित्र सुजीत येवले उपस्थित होते.
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491