*कोळसा खदानचे दुषित पाणी कन्हान नदी पात्रात सोडणे त्वरित थांबवा – माजी खासदार प्रकाश जाधव* # ) कामठी व इंदर खुली खदान व्दारे दोन एसटीपी लावुन पाणी स्वच्छ करूनच सोडुन कन्हान नदी पात्र प्रदुर्षण मुक्त करा*
नागपूर कन्हान : – वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान मध्ये कोळसा उत्खनन करताना दररोज दुषित पाणी कन्हान नदी पात्रात लोकवस्तीच्या घाण मिश्रीत सांडपाण्यासह नाल्या व्दारे सोडल्याने नदीत प्रदुषित झालेले पाणी परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवठा होऊन विविध आजाराने लोकांना जगण्यास धोका निर्माण होत असल्याने वेकोलि कोळसा खदानचे दुषित पाणी कन्हान नदी पात्रात सोडणे त्वरित थांबवुन दोन एसटीपी लावुनच सोडावे. अशी मागणी माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात सृञ नागरिकांच्या शिष्टमंडळाने वेकोलि कामठी उपक्षेत्र प्रबंधक श्री सुरेश तळणकर हयाच्याशी चर्चा करून निवेदन देऊन मागणी केली आहे
शुक्रवार (दि.२९) ला माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात सृञ नागरिकांच्या शिष्टमंडळाने वे कोलि कामठी उपक्षेत्र प्रबंधक श्री सुरेश तळणकर हयाना भेटुन चर्चा करित वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली कोळसा खदान मध्ये कोळसा उत्खनन करताना दररोज दुषित पाणी बाहेर फेकण्यात येते हे पाणी व कांद्री, सुरेस नगर, धरमनगर , पिपरी जवळील नाल्याने लोकवस्तीची घाण व सांडपाणीसह तसेच इंदर खुली खदान व लोकवस्तीचे दुषित पाणी कन्हान नदीत बिनधास्तपणे सोडल्या जात असल्याने कन्हान नदी पात्र मोठया प्रमा णात प्रदुषित झाली आहे. याच नदीतुन कन्हान, कांद्री व परिसरातील नागरि कांना फक्त बिलीचिंग टाकुन पिण्याकरिता नदीचे पाणी पुरवठा होत अस ल्याने नागरिक विविध रोगाच्या आजाराने त्रस्त असुन नागरिकांना जगण्यास धोका निर्माण झाला आहे. यास्तव वेकोलि कोळसा खदानचे दुषित पाणी कन्हान नदी पात्रात सोडणे त्वरित थांबवावे. कन्हान नदीत मिळणा-या काम ठी खुली खदान चे धरमनगर पिपरी जवळील नाल्यावर व इंदर खुली खदान चे गाडेघाट जवळील नाल्यावर असे दोन एसटीपी लावुन पाणी स्वच्छ करून च सोडण्यात यावे जेणे करून कन्हान नदीला प्रदुषित होण्यापासुन तसेच परिसरातील नागरिकांचे आरोग्य वाचविता येईल.
नागपुर जिल्हयाची प्राणज्योत कन्हान नदीचे अस्थित्व धोक्याच्या घडी कडे जाताना तञां व्दारे वर्तविल्या जात असताना कोळसा उत्खनन जसे राष्ट्रा करिता महत्वाचे आहे तसेच कन्हान नदी पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्त्रोत असल्याने नागरी जिवन जगविण्या करिता ही नदी प्रदुर्षण मुक्त करणे काळाची गरज आहे. यास्तव वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत कामठी व इंदर खुली खदान व्दारे कन्हान नदी मुखा जवळुन १ किमी दुर अंतरावर दुषित पाण्याच्या नाल्यावर दोन एसटीपी लावुन पाणी स्वच्छ करूनच नदीत सोड ण्यात यावे. अन्यथा आपणास जल आंदोलनास सामोरे जावे लागेल. आणि त्या आंदोलना दरम्यान उदभवणा-या सर्व परिस्थितीस आपण सर्वश्री जवाब दार राहाल. असे निवेदन दिले. याप्रसंगी माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठा न कन्हान चे संस्थापक अध्यक्ष मा प्रकाश भाऊ जाधव, दिलीप राईकवार, कमलेश पांजरे, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, प्रमोद निमजे, सिन्नु विणेवार, कमलसिंग यादव, अजय ठाकरे, प्रविण गोडे, आकाश पडितकर, रविंद्र दुपारे, रूपेश सातपुते, किशोर बावणकुळे, विजय तिवारी, कमल यादव, मनिष गोल्लर, निलेश गाढवे, केतन भिवगडे, श्याम मस्के आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535