BREAKING NEWS:
महाराष्ट्र

कोरोना योद्धाचा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडी संघटनेतर्फे तुमसर येथे सत्कार

Summary

तुमसर तहसील वार्ता:- कोविड-१९ च्या प्रसार रोखन्यात सर्व देश एकवटुन काम करत असून कोविड संदर्भत सरकारी आदेशाचे पालन करत आहे, गेल्या 7 महिन्या पासून याचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्याचबरोबर संपूर्ण मानवतेच्या हितासाठी, कोरोना यौद्धे आपल्या जीवाची परवा न करता, आपल्या […]

तुमसर तहसील वार्ता:- कोविड-१९ च्या प्रसार रोखन्यात सर्व देश एकवटुन काम करत असून कोविड संदर्भत सरकारी आदेशाचे पालन करत आहे,
गेल्या 7 महिन्या पासून याचा प्रादुर्भाव सुरु आहे. त्याचबरोबर संपूर्ण मानवतेच्या हितासाठी, कोरोना यौद्धे आपल्या जीवाची परवा न करता, आपल्या कार्यानुसार भक्कम पने उभे राहून लढा देत आहेत. या सर्व योद्धयांच्या साहस,निस्वार्थ त्याग आणि कोरोनाच्या कर्तव्याप्रति समर्पण भावना तसेच जगभरात करोनाविरुद्ध सुरु असलेली ही लढाई आपन नक्कीच जिंकु.
या लढाईत आघाडी वर असलेले डॉक्टर्स, परिचारिका, निमवैधकिय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी सध्या अविरत काम करत असून, या कसोटीच्या काळात तालुक्यातील लोक सुरक्षित राहावे आणि त्यांना योग्य चिकित्सा मिळावी याची दक्षता घेत आहेत, त्यांचे श्रम आणि चिकाटीच्या प्रयत्नामुळे आपन कोरोनाचा प्रसार नियंत्रित ठेवण्यात यश मिळवले आहे,
आता जेव्हा देश कही निर्बंध शिथिल करण्याची तयारी करत आहे, त्याचवेळी या युद्धात लढ़णाऱ्या कोरोना योद्धयांच् आभार मानून या पुढेही मानवी आयुष्य वाचवन्यसाठी असिच सेवा द्यावी, अशी प्रेरणा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडी संघटना तुमसर तालुका यांनी या कृतीतून दिली आहे.
कोविड-19 चा प्रसार रोखण्याचे आव्हान कोरोना योद्ध्यांनी स्वीकारले असून, त्यांचा दृढनिश्चय आणि जिद्द यामुळेच आपण कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यात यशस्वी ठरतो आहोत. या सर्व डॉक्टर्स पुरुष/महिलांनी दाखवलेला उत्साह अतुलनीय असून ते संपूर्ण तालुकावासियांच्या अभिनंदनास पात्र आहेत. या कोरोना योध्यांनी तालुक्यासाठी दिलेल्या निस्वार्थ सेवेसाठी, आम्ही महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघडी तुमसर तालुक्याचे पदाधिकारी युवक सदस्य त्यांना सलाम करतो,
कोविड-19 च्या लढ्यात सहभागी असलेल्या योध्यांचा आज महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडी तुमसर तालुका संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यात सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र शाषन सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर या ठिकाणी सत्कार करण्यात आले, सत्कार समारंभा वेळी डॉ. बाळबुधे सर तसेच इतर डॉक्टर्स वर्ग उपस्थित होते.
तसेच सत्कारार्थ महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडी तुमसर तालुक्याचे अध्यक्ष – श्री संकेतदादा लांजेवार.
उपाध्यक्ष – श्री मयूरभाऊ बड़वाईक,
श्री गुणवंतभाऊ सेलोकर.
महासचिव- श्री प्रमोदभाऊ रेवतकर.
सचिव-श्री भूषणभाऊ येळणे,
श्री हेमंतभाऊ मलेवार.
सह सचिव- श्री शुभमभाऊ लांजेवार.
संघटन सचिव- श्री अनुजभाऊ मलेवार.
संघटक सचिव-श्री शंकरभाऊ सेलोकर उपस्थित होते.

अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *