BREAKING NEWS:
महाराष्ट्र

कोतवाली पोलीस स्टेशन ची शिपाई ज्योती पानतावणे यांचा सत्कार

Summary

नागपूर जिल्हा वार्ता:- कोतवाली पोलीस स्टेशन येथील शिपाई कु.ज्योतीताई पानतावणे यांना पुष्पगुच्छ व चांदीची दुर्गा देवीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. ज्योती ताईंनी गांधीगेट, महाल नागपूर येथे सापडलेली 45000 रुपयांची भरलेली बॅग पोलीस स्टेशन मध्ये जमा करून तिच्या मालकाला ती […]

नागपूर जिल्हा वार्ता:- कोतवाली पोलीस स्टेशन येथील शिपाई कु.ज्योतीताई पानतावणे यांना पुष्पगुच्छ व चांदीची दुर्गा देवीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. ज्योती ताईंनी गांधीगेट, महाल नागपूर येथे सापडलेली 45000 रुपयांची भरलेली बॅग पोलीस स्टेशन मध्ये जमा करून तिच्या मालकाला ती परत मिळवून दिली,आणि यावरून पोलीस हे जनतेचे मित्र आहेत हे सिद्ध करून दाखविले.त्याप्रीत्यर्थ आजच्या या घडीच्या क्षणी ज्योती ताईंच्या या प्रमाणिकपणाचा बोध सर्वांना व्हावा म्हणून त्यांचा सन्मान प्रसंग घडविण्यात आला. त्यावेळी माजी उपमहापौर ,नगरसेवक श्री किशोर कुमेरिया व मित्र परिवार तसेच सागर चरडे, राजेश शेंगर, वैभव मानापुरे, रोशन टेकाडेव कोतवाली पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी उपस्थित होते.
पोलिसाच्या या प्रामाणिक कार्यबद्दल समाजात कौतुक होत आहे,असेच कार्य पोलिस विभागात होत राहिल्यास खरोखर समाज सुखरूप राहील अशी समाजातून प्रतिक्रीया येत आहे,
✍🏼तुषार चापले
नागपूर शहर प्रतिनिधी
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *