केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ वर प्रतिक्रिया *बेरोजगारी व उद्योगधंद्यांना मारक अर्थसंकल्प* — डॉ. आशिष देशमुख
Summary
कोरोनाच्या महामारीनंतर बेरोजगारी, व्यापार, शेतकऱ्यांच्या समस्या, आर्थिक मंदी, उद्योगांमध्ये आर्थिक गुंतवणूक, आरोग्य, महागाई व पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीत सतत होणारी वाढ या देशातील प्रमुख समस्या आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाल्यामुळे लाखो लोकांच्या हातचा रोजगार गेला. या समस्यांवर मात करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी काहीच ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात केल्या नाहीत. हा सर्वसाधारण अर्थसंकल्प असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना […]
कोरोनाच्या महामारीनंतर बेरोजगारी, व्यापार, शेतकऱ्यांच्या समस्या, आर्थिक मंदी, उद्योगांमध्ये आर्थिक गुंतवणूक, आरोग्य, महागाई व पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीत सतत होणारी वाढ या देशातील प्रमुख समस्या आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाल्यामुळे लाखो लोकांच्या हातचा रोजगार गेला. या समस्यांवर मात करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी काहीच ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात केल्या नाहीत. हा सर्वसाधारण अर्थसंकल्प असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सवलतींमध्ये वाढ करणे गरजेचे होते.
आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गाला सरकारने दुर्लक्षित केले आहे.
सद्यस्थितीत देशात मागील ४५ वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी वाढण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे युवक-युवतींना रोजगारासाठी भटकंती करावी लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. बंद असलेल्या किंवा मृतावस्थेत असलेल्या उद्योगांना पुनर्जीवित करण्यासाठी उपाययोजना, औद्योगिक गुंतवणुक, नवे उद्योग, जीडीपी दरातील उतार या समस्यांवरसुद्धा काहीच तोडगा अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे ‘५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे मोदी सरकारचे स्वप्न भंगले आहे. बेरोजगारी व उद्योगधंद्यांना मारक असा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार व काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.