किरीट सोमय्या अटकेत, अलिबाग पोलिसांची कारवाई
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना अलिबाग पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त समोर येत आहे. किरीट सोमय्या यांनी आज (१० फेब्रुवारी) थोड्याच वेळापूर्वी स्वतःच ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “कोरलेई जमीन घोटाळा ची चौकशी करायला ठाकरे सरकार तय्यार नाही, म्हणून आमचे ठिय्या, धरणा आंदोलन जिलाधिकारी कार्यालय अलिबाग येथे रात्रभर सुरू ठेवायचा निर्धार केला. परंतू आत्ता रात्री 8.15 वाजता पोलिसांनी आमची अटक केली. अलिबाग पोलिस स्टेशनला घेवून जात आहे”, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरलई येथे जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंविरोधात भाजप आक्रमक झाला असून याच याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांचे आंदोलन सुरु होते. सोमय्या यांच्या या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“रायगड जिल्हाधकारी, ठाकरे सरकार कोरलेई जमीन घोटाळा ची चौकशी करायला तय्यार नाही, म्हणून आमचे ठिय्या, धरणा आंदोलन जिलाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आज रात्रभर सुरूच आहे”, असे ट्विट काहीच वेळापूर्वी सोमय्या यांनी केले होते. मात्र पोलिसांनी यात हस्तक्षेप करत सोमय्या यांना अटक केली आहे.
✍️ प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991